Take a fresh look at your lifestyle.

‘टिकटॉक’ परत येतंय का? भारतात बंदी असतानाही पाहा या कंपनीने काय केलंय..?

नवी दिल्ली : टिकटॉक.. अल्पावधीत भारतीयांच्या मनावर गारुड करणारे अँप.. या अँपने काही काळात अनेकांना स्टार बनविले. मात्र, भारत-चीनमधील वादात अनेक चिनी अँपवर भारताने बंदी घातली आणि त्यात टिकटॉकचाही बळी गेला. देशभरात केंद्र सरकारने ‘टिकटॉक’ (Tiktok app)वरही पूर्ण बंदी घातली.

Advertisement

मात्र, भारतात पुन्हा परतण्याची आशा या कंपनीने अजूनही सोडलेली नाही. त्यामुळेच भारतात पूर्ण बंदी असतानाही या अॅपकडून नवीन सोशल मीडिया (Social media) कायदे आणि भारतीय मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात ‘टिकटाॅक’ परतणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत.

Advertisement

अवघ्या काही सेकंदाचे ‘शॉर्ट व्हिडीओ’ (Short video) बनवून अनेक जण ‘टिकटॉक’द्वारे अनेक जण प्रकाशझोतात आले. मोठे सेलिब्रिटी झाले. भारतात बंदी घातल्याने या कंपनीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भारतात परत येण्यासाठी ही कंपनी आजही यथोचित प्रयत्न करीत असल्याचे दिसते. त्यामुळेच पूर्ण बंदी असताना, ‘टिकटाॅक’ कंपनी केंद्र सरकारच्या नव्या नियमांचं पालन करताना दिसत आहे.

Advertisement

‘टिकटॉक’वरील बंदी हा पूर्णतः वेगळा आणि सोशल मीडियाचे नियम पाळणे हे दोन्ही पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे ‘टिकटाॅक’ भारतात पुन्हा सुरू होण्याची शक्यता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

Advertisement

भारतात परतण्याची आशा

Advertisement

‘टिकटॉक’ कंपनीने मात्र भारतात परतण्याची आशा सोडलेली नाही. केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र पाठवून, आम्ही सर्व नियमांचं पालन करण्यास तयार असल्याचे वचन ‘टिकटॉक’ने दिले आहे. परंतु, सध्याच्या काळात केंद्र सरकार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल, असं चित्र दिसत नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply