Take a fresh look at your lifestyle.

करोनाजन्मावरून पेटलाय अमेरिका-चीनचा वाद; पहा चीनने काय केलाय पलटवार

बिजींग : कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला वाद आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. एंथनी फाऊची यांचा एक ई-मेल लीक झाला होता. त्यामुळे अमेरिकेत तर राजकीय वादळ उठले आहेच. मात्र, चीनलाही पलटवार करण्याची संधी मिळाली आहे. मग, काय चीननेही संधी साधत अमेरिकेवर जोरदार पलटवार केला आहे. तसेच कोरोनबाबतही सुनावले आहे.

Advertisement

अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टने लीक ई मेल्सबाबत असा दावा केला आहे, की २८ मार्च २०२० रोजी चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे निदेशक डॉ. जॉर्ज गाओ यांनी डॉ. फाऊची यांना एक मेल पाठवला होता. या मेलमध्ये अमेरिकेत लोकांना मास्क वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले नाही, म्हणून केलेल्या टीकेबद्दल डॉ. गाओ यांनी माफी मागितली होती. गाओ यांनी याआधी असे म्हटले होते, की अमेरिका आपल्या नागरिकांना मास्क वापरण्यास सांगत नसल्याने मोठी चूक करत आहे. डॉ. फाऊची यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देत हे सर्व निराधार असल्याचे म्हटले. नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडलेल्या त्या लोकांबाबत माहिती द्या, त्यांचा वैद्यकिय अहवाल पहायचा आहे. ते खरच आजारी पडले होते का, त्यांना नेमके काय झाले होते, असेही डॉ. फाऊची यांनी या मेलमध्ये म्हटले होते. हा मेल आता सार्वजनिक झाला आहे.

Advertisement

या सर्व प्रकारामुळे आता अमेरिकेची कोंडी झाली आहे. चीनलाही हे समजले आहे. त्यामुळे या प्रकारावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ‘डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना व्हायरसशी संपर्क आला नाही, असे वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने सांगितले आहे,’ असे चीनच्या विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले. ‘कोरोना विषाणू कुठून आला हेच जर शोधायचे असेल तर आता अमेरिकेने त्यांच्याच देशात जागतिक आरोग्य संघटनेस बोलवावे. जगात त्यांच्या दोनशे पेक्षा जास्त बायो लॅब आहेत, यानिमित्ताने त्यांचीही माहिती द्यावी,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, ई मेल लीकचा मुद्दा अमेरिकेतही गाजत आहे. विरोधी रिपब्लीकन पार्टीचे नेते डॉ. फाऊची यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. काही जणांनी तर डॉ. फाऊची यांनी आता तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर एका नेत्याने त्यांना धोकेबाज डॉक्टर म्हटले आहे. या घडामोडींमुळे अमेरिकेत राजकारण जोरात सुरू आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply