Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या चक्रव्यूहात अडकला भारत; पहा नेमके काय म्हटलेय WHO ने

दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जो हाहाकार उडाला, तो अवघ्या जगाने पाहिली. कोरोना विषाणू किती विध्वंस करू शकतो, याचीही प्रचिती आली. एकाच दिवसात लाखो नवे रुग्ण, मृत्यूंचा आकडाही धडकी भरवणारा, ऑक्सिजन नाही म्हणून प्राण सोडणारे रुग्ण, ऑक्सिजनसाठीच जीवाचा आटापिटा करणार नातेवाईक.. असे अगदीच विदारक चित्र या काळात होते. भारतातील या कोरोनाच्या थैमानाने जगाचेही टेन्शन वाढवले होते.

Advertisement

आता मात्र दुसरी लाट ओसरत आहे, त्यामुळे दिलासाही मिळत आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकांनाच असा प्रश्न पडला आहे, की नेमके असे काय घडले, असे काय कारण होते की ज्यामुळे देशात दुसऱ्या लाटेत एवढा हाहाकार उडाला. आता, या प्रश्नाचे उत्तर जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संघटनेच्या संशोधकांनी आधी अभ्यास केला. त्यानंतर आता त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. भारतात दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू फोफावण्यामागे ‘B.1.617’ हे त्या विषाणूचे बदललेले स्वरुप कारणीभूत होते. देशात दुसरी लाट पसरण्यामागे कोरोना विषाणूचा ‘डेल्टा’ व्हेरिएंट कारणीभूत होता, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हा व्हेरिएंट अल्फापेक्षा ५० टक्के जास्त संसर्गजन्य आहे. तसे पाहिले तर कोरोना विषाणूने आपले स्वरुप बदलले आहे. बदललेल्या रुपात तो जास्तच घातक ठरला आहे. याआधी आफ्रिकेत आढळलेल्या एका स्ट्रेनने असाच धुमाकूळ घातला होता. मात्र, भारतात आढळलेला वेरिएंट जास्तच संक्रामक आणि धोकादायक असल्याचे सिद्ध झाले. या वेरिएंटनेच भारतात हाहाकार उडवला होता, असे आता जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासावरुन स्पष्ट झाले आहे.

Advertisement

भारतात ऑक्टोबर २०२० मध्ये आढळलेल्या ‘B.1.617.2’ व्हेरिएंटला ‘डेल्टा’ तर दुसऱ्या ‘B.1.617.2’ व्हेरिएंटला ‘कप्पा’ असे नाव देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अन्य देशांत आढळलेल्या व्हेरिएंटनाही नावे दिली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगितले आहे. दरम्यान, भारतात आढळलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरुन मध्यंतरी बराच गदारोळ झाला होता. केंद्र सरकारनेही यावर तीव्र आक्षेप घेतला होता. भारतात तर हा राजकारणाचाच मुद्दा ठरला होता. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यानंतर आरोग्य संघटनेने मात्र प्रतिक्रिया दिली होती. आरोग्य संघटनेने म्हटले होते, की ‘संघटना कोणत्याही व्हेरिएंटला देशावरुन नाव देत नाही. संघटना विषाणूच्या स्वरुपाला त्याच्या शास्त्रीय नावानेच संबोधित करते.’

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply