Take a fresh look at your lifestyle.

योगीराज्य आहे ‘त्यामध्ये’ प्रथम; पहा कशात अन कोणत्या राज्यांना पिछाडीवर टाकलेय युपीने

दिल्ली : जगभरातच रोजगाराचे संकट आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात तर रोजगाराचा मुद्दा कायमच चर्चेत असतो. राजकारणी मंडळीचे राजकारण सुद्धा यावर चालते. सरकार कोणतेही असतो, रोजगाराचे आव्हान समोर असतेच. त्यामुळे नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार प्रयत्न करत असतात.

Advertisement

आता देशातील रोजगाराबाबत सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) संस्थेने देशातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या राज्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जास्त रोजगार कोण देणार, याचे उत्तर सोपेच आहे. ज्या राज्यात जास्त औद्योगिकरण झाले आहे, वेगाने विकसित होणारे राज्यच जास्त रोजगार देईल ना. पण, जरा थांबा कारण, अहवाल काही वेगळेच सांगतोय. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, सध्या सर्वाधिक रोजगार देणारे राज्य उत्तर प्रदेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे. नागरिकांना रोजगार देण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्य दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, तामिळनाडू या राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे, असे संस्थेच्या मे महिन्याच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाचा देत राज्य सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की राज्यात बेरोजगारीचा दर ६.९ टक्के इतका आहे. २०१८ मधील दराच्या तुलनते हा दर तीनपट कमी आहे. राजधानी दिल्लीत बेरोजगारी दर ४५.६ टक्के, राजस्थान २७.६ टक्के, केरळ २३.५ टक्के, पश्चिम बंगाल १९.३ टक्के, तामिळनाडू २८ टक्के, झारखंड १६ टक्के, आंध्र प्रदेश १३.५ टक्के, पंजाब ८.८ टक्के आणि छत्तीसगड राज्यात बेरोजगारीचा दर ८.३ टक्के आहे.

Advertisement

ज्यावेळी राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले, त्यावेळी बेरोजगारी दर १७.५ टक्के होता. मात्र, त्यानंतर सरकारने रोजगाराबाबत प्रयत्न केल्याने आज हा दर कमी झाला आहे, असा दावा राज्य सरकारच्या प्रवक्त्याने केला आहे. दरम्यान, देशात आज रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना येण्याच्या आधीही हा प्रश्न होताच. मात्र, कोरोनाने असा काही झटका दिला की कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे सध्या बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला आहे. भविष्यात कोरोनाचा धोका कायम असल्याने बेरोजगारीची समस्या आणखी बिकट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात जगभरातील तब्बल २० कोटी लोक बेरोजगार होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच, या संकटातून लवकर सुटका होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply