Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चीनवर डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; मागितलीय तब्बल १० ट्रिलियन डॉलर्सची भरपाई..!

वॉशिंग्टन : अवघ्या जगाला कोरोनाच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या चीनच्य विरोधात आता अमेरिकेने आधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेचे आजी-माजी अध्यक्षांनी या मुद्द्यावर चीनवर जोरदार प्रहार केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तर करोना विषाणूचे उत्पत्तीचे ठिकाण तीन महिन्यात शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे दोन्ही देशांतील तणाव आधिकच वाढला आहे. त्यानंतर आता माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही चीनला घेरले आहे.

Advertisement

तसेही डोनाल्ड ट्रंप सुरुवातीपासून चीनलाच जबाबदार धरत आहेत. आता तर त्यांनी चीनकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी केली आहे. नुकसान भरपाई ती पण किती तर तब्बल १० ट्रिलियन डॉलर्स. होय, कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमध्येच झाली. त्यानंतर हा घातक विषाणू जगभरात पसरला आणि कोट्यावधी लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, म्हणून ट्रंप यांनी चीनला फटकारत १० ट्रिलियन डॉलर्स वसूल करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत ट्रंप म्हणाले, की प्रत्येक जण इतकेच काय शत्रूला देखील विश्वास आहे, की मी जे म्हणत होतो, तेच बरोबर आहे. वुहान प्रयोगशाळेतूनच या चिनी विषाणूचा उगम झाला. या विषाणूमुळे अमेरिका आणि जगभरात जो काही विध्वंस आणि लोकांचे मृत्यू झाले आहेत, त्याची भरपाई म्हणून चीनने आता १० ट्रिलियन डॉलर्स द्यावेत.

Advertisement

दरम्यान, कोरोनाची उत्पत्ती चीनच्याच प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप यांनी ट्रंप यांनी अनेकदा केला होता. चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या तपासणीत असे काही दिसले नाही. आरोग्य संघटनेने तर असे म्हटले की हा विषाणू एखाद्या प्राण्यातून माणसांत फैलावला असावा. या अहवालावर मात्र जगभरातून टीका करण्यात आली. ट्रंप यांनी तर थेट आरोग्य संघटनेवरच आगपाखड केली. संघटना या प्रकरणात चीनचे संरक्षण करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर अनेक संशोधकांनी हा विषाणू प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी तर अमेरिकेच्या एका वृत्तपत्रात याबाबत असा अहवाल प्रसिद्ध झाला. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली. त्यामुळे हा विषाणू लॅबमधून लीक झाल्याच्या दाव्यास आधिक बळकटी मिळाली. या अहवालानंतर लगेच अध्यक्ष जो बायडेन यांनी गुप्तचर संस्थांना कोरोनाचे ठिकाण शोधण्याचा आदेश दिला. या घडामोडींनंतर चीनने प्रतिक्रिया दिली होती. आता ट्रंप यांच्या वक्तव्यावर चीन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply