Take a fresh look at your lifestyle.

आलीय की संधी.. व्यवसायाला राज्य सरकार देतेय 15 लाख रुपये; पहा कसा अन कुठे करायचाय अर्ज..!

पुणे : भन्नाट अशा नव्या उद्योजकीय कल्पना वास्तवात आणण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून स्टार्टअपला मदत करण्याच्या अनेक योजना आहेत. आपली उद्योजकीय कल्पना किंवा व्यवसाय भन्नाट असेल, तो व्यवहार्य असेल आणि आपल्याला तो मोठा करण्याचा आत्मविश्वास असेल तर अशा तरुण-तरुणींसाठी ही एक मोठी संधी आहे. महाराष्ट्र सरकारने सध्या त्यासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

महाराष्ट्र स्टार्टअप वीक हा राज्यातील उद्योजकीय पर्यावरणाला (इकोसिस्टीमला) प्रोत्साहन देण्याचा आणि सक्षम करण्यासाठीचा प्रयत्न आहे. या सप्ताहामुळे नवउद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध होते, ज्याद्वारे ते समस्या निवारणाच्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना महाराष्ट्र शासनासमोर सादर करू शकतात. शिक्षणक्षेत्र, कौशल्यविकास, आरोग्यसुविधा, कृषी, स्वच्छ उर्जा, पर्यावरण, जल आणि कचरा व्यवस्थापन, अद्ययावत पायाभूत व्यवस्था आणि चलनवलन, अधिशासन आणि इतर क्षेत्रांतील स्टार्टअप्सना अर्ज दाखल करण्यासाठी इथे आमंत्रित करण्यात येते.

Advertisement

विविध इकोसिस्टीम पार्टनर्सच्या मदतीने, सहभागी स्टार्टअप्सपैकी सर्वोत्कृष्ट 100 स्टार्टअप्स ची तज्ज्ञ परीक्षकांकडून निवड केली जाते. या निवडक 100 नवउद्योजकांना एखादी विशिष्ट समस्या सोडवण्यासंदर्भातली नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याची संधी मिळते. सदर परीक्षकांमध्ये शासकीय, औद्योगिक, शैक्षणिक आणि गुंतवणूक क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश असतो. आठवडाभर चालणार्‍या या कार्यक्रमामध्ये, निवडला गेलेला प्रत्येक नवउद्योजक हा वरिष्ठ सरकारी अधिकारी, औद्योगिक विशेषज्ञ, शैक्षणिक विशेषज्ञ आणि व्यावसायिक भागीदारांचे गट यांच्यासमोर आपल्या स्टार्टअपचे सादरीकरण करतो.
आता 100 पैकी एकूण 24 स्टार्टअप्सना विजेते म्हणून निवडण्यात येते. त्यांना शासनाच्या विविध विभागांशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून 15 लाखांपर्यंतचे कार्यादेश (वर्क ऑर्डर्स) प्राप्त होतात. तसेच, या नवउद्योजकांना त्यांची उत्पादने किंवा सेवा प्रत्यक्षात देण्यासाठी शासकीय यंत्रणेचा लाभ मिळतो; आणि शासनाच्या संस्थात्मक भागीदारांकडून 12 महिन्यांपर्यंत मार्गदर्शन देण्यात येते. यात सहभागी होणार्‍या स्टार्टअप्सना इतर अनेक लाभ मिळतात. जसे – क्लाउड क्रेडीट, अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागाची संधी, इकोसिस्टीममधील मार्गदर्शक, गुंतवणूकदार यांसारख्या घटकांशी जोडले जाण्याची संधीही मिळते.

Advertisement
योजनेसाठी अर्ज करताना लक्षात घेण्याच्या महत्वाच्या तारखा अशा :
अर्ज सुरू झाल्याची तारीख : 12 मे 2021
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 15 जून 2021
बेस्ट 100 स्टार्टअप यांची यादी जाहीर होणार : जुलै 2021
स्टार्टअप आठवडा : 9 ते 13 ऑगस्ट 2021
अंतिम 24 विजेत्यांची घोषणा : 13 ऑगस्ट 2021
संपर्क करण्यासाठी अर्ज करण्यासाठी लिंक : www.msins.in / Maharashtra State Innovation Society (msins.in)

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply