Take a fresh look at your lifestyle.

अरे व्हा की टेक्नोसॅव्ही; पहा नेमके काय होणार आहे ग्रामीण भारतात, गावेच होणार जास्त स्मार्ट

दिल्ली : काही वर्षांपूर्वी ‘स्मार्टफोन’, ‘इंटरनेट’ हे शब्दही कुणाला माहित नव्हते. मात्र, आज या दोन गोष्टी नसतील तर… असा विचार करणे सुद्धा शक्य नाही, असा सध्याचा काळ आहे. खिशात ‘स्मार्टफोन’ नाही, असा माणूस आज क्वचितच सापडेल. नुसता फोन असून काय उपयोग, ‘इंटरनेट’ पाहिजेच ना.. त्यामुळे आज जगभरात इंटरनेट वापरकर्ते वेगाने वाढत आहेत. विकसित देश असो किंवा गरीब देश, मेट्रो सिटी असो नाहीतर एखादे छोटे खेडे, सगळीकडेच इंटरनेटचे युजर वेगाने वाढत आहेत.

Advertisement

भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशात तर आजमितीस इंटरनेटचे कोट्यावधी युजर आहेत, आणि हा आकडा निरंतर वाढतच आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण, २०२५ पर्यंत देशात तब्बल ९० कोटी इंटरनेट युजर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आणि आणखी महत्वाचे म्हणजे, या बाबतीत गावे शहरांवर मात करतील. म्हणजे, २०२५ पर्यंत शहरांच्या तुलनेत गावात इंटरनेट युजर्सची संख्या जास्त असेल, असे अहवालात म्हटले आहे. देशात ४५ टक्के दराप्रमाणे इंटरनेट युजर्सची संख्या वाढत आहे. सध्या देशातील शहरी भागात दुप्पट वेगाने इंटरनेट उपलब्ध होत आहे. त्यातुलनेत ग्रामीण भाग मागेच आहे. मात्र, या भागात दरवर्षी वाढणाऱ्या इंटरनेट युजर्सची संख्या शहरी भागापेक्षा जास्त आहे. आजमितीस शहरी भागात ३२ कोटी इंटरनेट युजर्स आहेत तर त्याचवेळी ग्रामीण भागात इंटरनेट युजर्सच्या संख्येत १३ टक्के वाढ झाली आहे. आता ही संख्या २९.९ कोटी इतकी आहे.

Advertisement

इंटरनेट कंपनी ‘आयएएमएआय’ आणि सहयोगी कंपनी ‘Kantar’ ने याबाबत सर्वे केला होता. यामध्ये असे दिसून आले, की ग्रामीण भागातील अगदी लहान खेड्यातही प्रत्येकी ५ व्यक्तींपैकी २ जण इंटरनेट वापरतात. तर दुसरीकडे देशातील ९ मेट्रो शहरात ३३ टक्के इंटरनेट युजर्स आहेत. देशाच्या १४३ कोटी लोकसंख्येत ६२.२ कोटी लोक आज इंटरनेटचा वापर करतात. ग्रामीण भागात मात्र इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या कमी आहे. नजीकच्या काळात यामध्ये वाढ होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालाचा विचार केला तर भारतात रोजच इंटरनेटच्या वापराचे प्रमाण वाढत चालले आहे. अन्य देशांच्या तुलनेत येथे मोठ्या संख्येने इंटरनेट युजर्स आहेत. आता देशातील ग्रामीण भागातही इंटरनेट मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply