Take a fresh look at your lifestyle.

पगाराबाबत आलीय की महत्वाची बातमी; पहा कसा फायदा होणार RBI च्या निर्णयाचा

दिल्ली : महिना संपत आला की नोकरदार मंडळींना पगाराचे वेध लागतात. काही कंपन्या अगदी वेळेत पगार बँक खात्यात जमा करतात मात्र, काही कंपन्या तर अशाही आहेत, की बऱ्याचदा पगार वेळेवर करत नाहीत. त्यातही सुट्टीचा दिवस असेल तर मग काय बोलायचे, पगारास हमखास उशीर होणारच. पगारास उशीर झाला की कर्मचाऱ्यांचे बजेट कोलमडलेच म्हणून समजा.. आता मात्र, कर्मचाऱ्यांचे पगाराचे टेन्शन कमी करणारी चांगली बातमी आली आहे. होय, आता सुट्टी आहे म्हणून पगार उशीरा होणार अशी सबब कायमची बंद होणार आहे. कारण, ‘नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टिम’ सर्वच दिवस सुरू राहणार आहे, अशी घोषणा आरबीआयने केली आहे. म्हणजेच, आता पगाराच्या दिवशी सुट्टी असली तरी पगार बँक खात्यात जमा होतील. आणि कर्जाचे हप्ते देखील देता येतील.

Advertisement

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली. येत्या १ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. याआधी खातेदार किंवा नोकरदारांनी ऑटो डेबिट सुरू केल्यानंतर सुद्धा सरकारी सुट्ट्या, बँक हॉलिडे या दिवशी बँका बंद राहत असल्याने ऑटो डेबिट सुद्धा बंदच असायचे. यामुळे पगार खात्यात जमा होत नव्हते. तसेच कर्जाचे हप्ते (bank loan emi) सुद्धा भरता येत नसायचे. ग्राहकांची चूक नसताना, खात्यात पैसे असताना सुद्धा फक्त सुटीचा दिवस होता, म्हणून हप्ता कपात झाला नाही. आणि त्यासाठी अतिरिक्त चार्जेस द्यावे लागले, हा अनुभव अनेकांनी घेतला आहेच. आता मात्र बँकेने ही अडचण दूर केली आहे. कारण, एनएसीएच सुविधा आता सातही दिवस सुरू राहणार आहे.

Advertisement

या निर्णयानंतर आता लोकांचीही जबाबदारी वाढणार आहे. सुटीच्या दिवशी पगार जमा होणार, ठीकच आहे. पण, आता आणखी एक खबरदारी घ्यावी लागणार आहे. सुटीच्या दिवशीच जर गृहकर्जाच हप्ता असेल, पर्सनल लोन किंवा वाहनाच्या कर्जाचा हप्ता असेल, वीज बिल भरायचे असेल तर खात्यात पैसे जमा ठेवावे लागणार आहेत. आज सुटीचा दिवस आहे, हप्ता कट होणार नाही, उद्या बघू या समजात आता राहता येणार नाही. कारण, या निर्णयानुसार सुटीचा दिवस असला तरी या दिवशी कर्जाचे हप्ते असतील तर ते कपात होणार आहेत. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply