Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. भयंकरच की.. पहा RBI ने आपल्या अहवालात नेमके काय म्हटलेय अर्थव्यवस्थेबाबत

दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे कितीही दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र, कोरोनाने तडाखा दिलाच आहे. देशांतर्गत व्यापाराचे कोट्यावधींचे नुकसान झाले. उद्योग-व्यवसायांना टाळे लागले. लघु उद्योग उद्धवस्त झाले. बेरोजगारी प्रचंड वाढली, कधी नव्हे ती गरीबी सुद्धा वाढली. देशाचा जीडीपी घसरला, या सर्वच निगेटीव्ह असताना अर्थव्यवस्था मजबूत राहणार कशी, असा प्रश्न आहेच. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा परिणाम झाला आहेच. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालातही हेच सांगितले गेले. त्यानंतर आता खुद्द आरबीआयनेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अंदाजात घट केली आहे.

Advertisement

याआधी एप्रिलमध्ये अर्थव्यवस्था १०.५ टक्के दराने वाढेल, असा अंदाज बँकेच्या आर्थिक धोरण समितीने व्यक्त केला होता. आज मात्र, चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ९.५ टक्के दराने वाढेल, असा अंदाज समितीने व्यक्त केला आहे. म्हणजेच, बँकेने आपल्या आधीच्या अंदाजात घट केली आहे. याबाबत ईटी नाऊ डिजीटलने वृत्त दिले आहे. आपबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की सध्याच्या आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ५.१ टक्के राहिल. रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात सवलत मिळणार नाही, असे स्पष्ट होत आहे. मार्जिनल स्टँडींग फॅसिलिटी रेट ४.२५ टक्क्यांवर आहे.सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईमुळे बँकेने आपल्या धोरणात बदल करण्याचे टाळले आहे, असे दास यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. रिवर्स रेपो रेट सुद्धा ३.३५ टक्के ठेवला आहे. या वर्षात पहिल्या तिमाहीत १८.५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ७.२ टक्के, चौथ्या तिमाहीत ६.६ टक्के अर्थव्यवस्था वाढेल, असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

अर्थव्यवस्थेचे चलनवलन निर्देशांक एप्रिल-मे महिन्यात घटले आहेत. मात्र, तरीही मागील वर्षातील पहिल्या लाटेच्या वेळी असलेल्या निर्देशांकाच्या तुलनेत जास्तच आहेत. आगामी काळात लसीकरण मोहिमेस वेग येईल आणि त्यामुळे अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले. जर लसीकरण मोहिमेत अडचणी आल्या तर, आर्थिक विकास दराच्या अंदाजात एक टक्का घट येऊ शकते, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेही सध्या लसी नसल्याने लसीकरणात अडचणी येत आहेतच. बँकांसाठी १५ हजार कोटींची तरतूद करणार आहेत. याद्वारे बँका हॉटेल, टूर ऑपरेटर, रेस्टॉरेंट, खासगी बस ऑपरेटर यांनी किफायतशीर कर्ज उपलब्ध करुन देऊ शकतील, असे अपेक्षित आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply