Take a fresh look at your lifestyle.

विरोधकांकडून नाही, पक्षांतर्गत वादातच काँग्रेस झालीय बेहाल; पहा कशामुळे, कुठे पेटलेय वातावरण

जयपूर : भाजपला देशात सध्या कोणताच पर्याय नाही असा समज आज दृढ होत असताना काँग्रेसने काही राज्यात भाजपला जोरदार टक्कर दिली. एवढेच नाही, तर पंजाब, राजस्थान यांसारख्या मोठ्या राज्यात सत्ताही आणली. मोठा संघर्ष करुन सत्ता मिळवली खरी पण, सत्ता टिकवण्यात मात्र काँग्रेसची चांगलीच दमछाक होत आहे. याचे कारण दुसरे असणार तरी काय, अंतर्गत कलह आणि गटबाजी. यामुळेच सध्या राजस्थान आणि पंजाबसारख्या मोठ्या राज्यांत काँग्रेसला विरोधकांच्या आधी स्वकीयांशीच संघर्ष करावा लागत आहे. आताचा प्रकार राजस्थानातील आहे.

Advertisement

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसच्याच दोन मंत्र्यांमध्ये जबरदस्त वाद झाले. प्रकरण एकमेकांना धमकी देण्यापर्यंत वाढले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. बोर्डाच्या परक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी मंत्री उपस्थित होते. या बैठकीत परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच डोटासरा आणि धारीवाल यांच्यात वादास सुरुवात झाली. त्यानंतर काही मंत्र्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. मात्र, बैठक संपल्यानंतर पुन्हा दोघांत वाद सुरू झाला. यानंतर शिक्षणमंत्री डोटासरा यांनी धारीवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे केल्याचे समजते. दरम्यान, हा वाद राज्यातील काँग्रेस पक्षाच्या भवितव्यासाठी निश्चितच योग्य नाही. त्यामुळे या प्रकरणी आता मुख्यमंत्री गेहलोत आणि काँग्रेस हायकमांड या वादावर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

दरम्यान, राजस्थान देशातील मोठे राज्य आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता मिळवली. मात्र, सुरुवातीपासूनच येथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटात वाद होते. मध्यंतरी तर सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या चर्चांनी काँग्रेसचे टेन्शन चांगलेच वाढले होते. मात्र, पायलट यांची समजूत काढण्यात यश आले. सचिन पायलट काँग्रेसमध्येच राहिले. तरी देखील अधूनमधून या दोन गटात वाद होतच असतात. तसेच येथे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद कमालीचा वाढला आहे. राजस्थानप्रमाणेच पंजाबमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह कमालीचा वाढला आहे. मध्य प्रदेशसारखे मोठे राज्य याच कारणामुळे काँग्रेसच्या हातातून गेले आहे. इतकेच नाही, अंतर्गत कलह आणि गटबाजीच्या कारणानेच काँग्रेसचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याचेही समोर आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply