Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; पहा कोणत्या मुद्द्यावर केलीय टीका

दिल्ली : कोरोनामुळे देशातील कोट्यावधी लोकांनी रोजगार गमावले आहेत. त्यामुळे आज देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने बेरोजगारीत आणखी वाढ होणार असल्याचे अहवालही येत आहेत. सरकारलाही याची जाणीव आहे. मात्र, ठोस निर्णय घेतले जात नाही, त्यामुळे ही समस्या कमी होत नाही. विरोधकांनी या मुद्द्यावरही केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषणेचाही समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘अबकी बार करोडो बेरोजगार, जबाबदार कोण?, फक्त आणि फक्त मोदी सरकार.’ कोरोना काळात काँग्रेस मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करत आहे. राहुल गांधी सध्या प्रत्येक मुद्द्यावर टीका करताना दिसतात. याआधी त्यांनी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी केंद्र सरकार लपवत असल्याचा आरोप  केला होता. कोरोनाबाबतही त्यांनी सरकारला इशारा दिला होता. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही उपाय सुद्धा सांगितले होते. मात्र, याचा फार काही उपयोग झाला नाही. पीएम केअर्समधून राज्यांना दिलेले व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन टंचाई, कोरोना लसींची कमतरता, लसीकरणाचे फसलेले नियोजन, केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण, वाढती महागाई, इंधन दरवाढ या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने मुंबईत मोठा मोर्चा काढला होता. केंद्रातील मोदी सरकारच्या सात वर्षांतील कारभाराचा निषेध करण्यासाठी राज्यभरात निदर्शनेही करण्यात आली होती.

Advertisement

लसींच्या मुद्द्यावर तर अन्य विरोधी पक्ष सुद्ध सरकारच्या धोरणावर नाराज आहेत. लसींची कमतरता आहे, लसी मिळत नाहीत, असे कितीदा सांगितले तरी सरकारला काही फरक पडत नाही. लसींंची टंचाई दूर करण्यासाठी नियोजन केले जात आहे. लसी कमी पडणार नाहीत. राज्यांकडे काही लसी शिल्लक आहेत, असे सरकारकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र, राज्यांना आजही पुरेशा लसी मिळत नाही, त्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. भविष्यातील कोरोना विषाणूचा धोका पाहता जास्तीत लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर लसींच्या कमतरतेचा प्रश्न मिटवावा. आणि राज्यांना पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply