Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट अपडेट : रोज होणार हजार टन कांद्याची निर्यात; पहा कुठे मिळतोय 2500 चा भाव

नाशिक : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेश सरकारने कांदा आयातीकरता भारतीय निर्यातदारांकडून अर्ज मागवले आहेत. बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे एक हजार टनाच्या आसपास कांद्याची निर्यात होते. यासह इतर देशातही कांद्याची निर्यात चालू आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

जगभरात करोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध ही सामान्य बाब बनली आहे. तरीही एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत कांद्याची 14 लाख 4 हजार टन इतकी निर्यात झाली होती. त्यातून 2434 कोटी रुपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला करोनाकाळात परकीय चलन मिळाले. आताही पुन्हा एकदा भारतीय कांद्याला परदेशातून मागणी वाढत आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. अशीच जर खुली परिस्थिती कायम राहिली तर भारतीय कांद्याची निर्यात वाढून उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा आहे. पश्चिम बंगालप्रमाणेच बांगलादेशमधील कांद्याची आवक संपली आहे. त्यामुळे बांगलादेशला आता भारतीय कांद्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

Advertisement

कांदा भावात हळूहळू तेजी येत असतानाच आता बांगलादेश सरकारने कांदा आयातीचा परवाना देण्याची तयारी सुरू केल्यावर निर्यात होण्याची चिन्हे लक्षात घेऊन कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी लासलगाव बाजार समिती आवारात बाजारभाव 700 ते 2131 रु. व सरासरी 1800 रुपये राहिले, तर पिंपळगावला प्रतिक्विंटल 2500 रुपये भाव मिळाला आहे. जिल्ह्यातील दिंडोरी, वणी, पिंपळगाव, सायखेडा, विंचूर, उमराणा, येवला, सिन्नर, देवळा, चांदवड, मनमाड या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक होत असून खरीप हंगामासाठी शेतकरीवर्गाला यंदा कांदा आधार देत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply