Take a fresh look at your lifestyle.

‘आणि त्यामुळे झाला गैरसमज..’; पहा अनलॉकबाबत वडेट्टीवारांच्या मुद्द्यावर काय म्हटलेय अजितदादांनी

मुंबई : राज्यात लॉकडाऊनबाबत सुरू असलेला गोंधळ अजूनही मिटलेला नाही. या मुद्द्यावर राज्य सरकावर जोरदार टीका करत आहेत. सत्ताधारी पक्षांकडून त्यास प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या मुद्द्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की अनलॉकबाबत राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील तेच अंतिम असते, असे म्हणत त्यांनी या मुद्द्यावर राज्य सरकारचे धोरण स्पष्ट केले.

Advertisement

याआधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यात अनलॉकचा निर्णय जाहीर केला होता. पाच टप्प्यात राज्यात अनलॉक केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ स्पष्टीकरण देत राज्यात अद्याप निर्बंध उठवलेले नाहीत, अनलॉकचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असल्याचे सांगितले. राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले खरे मात्र या सगळ्या कारभारावर विरोधक जोरदार टीका करत आहेत. राज्य सरकारचे मंत्री आता सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज दुपारी मंत्री वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले, की आपत्ती व्यवस्थापन विभागाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. याबाबतचा मसुदा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. या मसुद्यास मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यानुसार आढावा घेऊन मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात येतील.

Advertisement

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर मत व्यक्त केले. पवार म्हणाले, की कोरोनाचा आजार आल्यापासून मुख्यमंत्री स्वतः याबाबत माहिती देत असतात. आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा स्पष्टीकरण देत असतात. विजय वडेट्टीवार सुद्धा माहिती देत असतात. काल सुद्धा त्यांनी सांगितले. मात्र, बैठकीतील चर्चेची माहिती देत असताना त्यांच्याकडून एक शब्द राहून गेला आणि त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. दरम्यान, राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निर्बंधांत आणखी सवलती देण्याच्या उद्देशाने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. लॉकडाऊन मागे घेण्याची मागणीही केली जात आहे. दुसरीकडे मात्र, लॉकडाऊनबाबत सुरू असलेला गोंधळ अजूनही सुरुच आहे. अनलॉकचा निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही. याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply