Take a fresh look at your lifestyle.

इस्रायलमध्येही ‘राम’ने दिलाय सरकारला हात; पहा नेमके काय चालू आहे राजकारणात

दिल्ली : विचारांचे राजकारण नावाची व्याख्या जगभरात लोप पावत चालली आहे. जनता आणि मतदार यांच्यामध्ये वैचारिकता संपत येत असल्याने राजकीय पक्ष आणि पुढारी तर त्याला तिलांजली देण्यात आघाडीवर असणारच की. तसाच प्रकार फ़क़्त भारतात नाही, जगभरात चालू आहे. अगदी इस्रायल नावाच्या छोट्या देशातही. होय, सगळीकडे मतदार आणि त्यांच्या धार्मिक विचारांना फोफावण्याची संधी आहेच की.

Advertisement

तर, मुद्दा इस्रायल देशाचा आहे. भारतातला गोंधळ आपण रोजच पाहतोय आणि वाचतोयही. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निरोपाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या जागेवर आता  नेफ्टाली बेनेट हे पंतप्रधान होत आहेत. बेनेट यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यांना कट्टरवादी, डावे व मध्यममार्गी असा तब्बल आठ राजकीय पक्षांचे समर्थन असून अरब इस्लामी पार्टी ‘राम’ देखील या आघाडीत आहे. नेतन्याहूंच्या सत्तेचा शेवट करण्यासाठी त्यांची एकजूट झाली आहे.

Advertisement

एकूण १२० सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी ६१ जागा आवश्यक आहेत. नव्या आठपक्षीय आघाडीला बहुमत सिद्ध करता आले नाही तर पुन्हा निवडणूक होतील. इस्रायलमध्ये दोन वर्षांत चार वेळा निवडणूक झाली आहे. देशात स्थिर सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. कट्टरवादी यामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट (४९) पंतप्रधान होतील. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२३ पर्यंत राहील. त्यानंतर येश एटिड पक्षाचे नेते येर लॅपिड (५७) पंतप्रधान होतील. त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत राहील. अरब इस्लामी पार्टी ‘राम’ पक्षाचे नेते मन्सूर अब्बास हेही सत्तेत सहभागी झालेले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply