Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकेच्छुकांना दिलासा; पहा कोणता महत्वाचा निर्णय झालाय शिक्षण क्षेत्राताबत

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्यावर त्याची मुदत ७ वर्षांची होती. या कालावधीत नोकरी न मिळाल्यास पुन्हा टीईटी पास करूनच शिक्षक होण्यासाठी अर्ज करता येत होता. हाच अडसर दूर करून टीईटी परीक्षेची मान्यता आता तहहयात करण्याचा महत्वाचा निर्णय झाला आहे. शिक्षकेच्छुकांनी याचे स्वागत केले आहे.

Advertisement

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल “निशंक’ यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली. त्यांनी म्हटले की,  हा निर्णय २०११ पासूनच लागू राहणार आहे. म्हणजे २०११ पासूनच टीईटी प्रमाणपत्रांची वैधता ७ वर्षांनी वाढवून तहहयात करण्यात येत आहे. त्यामुळे पास झालेल्या आणि यापुढेही पास होतील त्यांना पुन्हा ही परीक्षा पुन्हा-पुन्हा द्यावी लागणार नाही.

Advertisement

सीटीईटीचे (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) आयोजन सीबीएसई करीत असून ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. पहिल्या पेपरमधील यशस्वी उमेदवारांना पाचवीपर्यंत शिकवता येते. शाळा शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी टीईटी प्रमाणपत्र आवश्यक आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सीटीईटीची वैधता वाढवून तहहयात करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार निर्णय झाला आहे. त्यामुळे ७ वर्षांचा अवधी पूर्ण झाला आहे त्यांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply