Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या भावात घसरण सुरूच, पहा किती रुपयांनी सोन स्वस्त झालंय..?

नवी दिल्ली : जागतिक बाजारात अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या घसरणीनंतर सोन्याचे दर दोन आठवड्याच्या निच्चांकावर गेले आहेत. त्याचाच परिणाम आज (ता.4) पाहायला मिळाला. सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) किमतींत आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली.

Advertisement

एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा वायदा 0.10% टक्क्यांनी घसरुन 48,627 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. तसेच, चांदीच्या भावातही 0.21% टक्क्याच्या घसरणीनंतर 70,663 रुपये प्रति किलोवर आली. या घसरणीमुळे दोन दिवसातच सोनं तोळ्यामागे हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Advertisement

मागील सत्रात भारतात सोन्याच्या दरात 2 टक्के, म्हणजेच तोळ्यामागे 950 रुपयांची घसरण झाली होती. तर, चांदी 2.5 टक्क्यांनी म्हणजेच 1,800 रुपयांनी घटली होती. सोन्याच्या किमतीत आज 0.10 टक्क्यांची घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याचे भाव 48,627 रुपयांवर, तर चांदीच्या किमतीत 0.21 टक्क्यांची घट होऊन MCX वर चांदीच्या किमती 70,663 रुपये किलोवर ट्रेड करीत होत्या.

Advertisement

स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी
2021-22 मधील ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम’ची तिसरी सीरिज 31 मे रोजी सुरु झाली. त्यामुळे नागरिकांना स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियानं ‘गोल्ड बॉन्ड स्किम’च्या तिसऱ्या सीरिजसाठी इश्यू प्राइस 4,889 रुपये प्रति ग्रॅम इतकी निश्चित केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply