Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. हेही संकट आहेच का? पहा ग्लोबल वॉर्मिंगचा नेमका काय बसायला लागलाय झटका

न्यूयॉर्क : जागतिक तापमान वाढीची समस्या आता जगासाठी डोकेदुखी ठरत आहे. या समस्येचा आपण कधी गांभीर्याने विचार केला नाही. मात्र, त्याचा पर्यावरणावर जो व्हायचा तो परिणाम झाला आहेच. आता हे संकट आधिक विक्राळ होत आहे. कुठे भीषण दुष्काळ तर कुठे चक्रीवादळांचे थैमान, कुठे ज्वालामुखीचा उद्रेक तर कुठे कडाक्याचा उन्हाळा.. असे परिणाम जग अनुभवत आहेच. आता या तापमानवाढीने पर्यावरणावर आणखी एक गंभीर परिणाम केला आहे.

Advertisement

जागतिक तापमान वाढीमुळे जगभरातील सरोवरांतील ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होत असल्याचे एका अभ्यासाद्वारे समजले आहे. हा प्रकार खूपच चिंताजनक आहे. कारण, याचा परिणाम थेट प्राणी आणि माणसांवर होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Advertisement

न्यूयॉर्क रेंससेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी अभ्यास करुन याबाबत अहवाल तयार केला आहे. त्यांनी सांगितले, की जगभरात ज्या ठिकाणी पाण्याची सरोवर आहेत, या सरोवरांवर जागतिक तापमान वाढीचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे सरोवरांतील ऑक्सिजन वेगाने कमी होत आहे. जर, पृथ्वीवरील महासागरांचा विचार केला तर या महासागरांच्या तुलनेत गोड्या पाण्याच्या सरोवरांतील ऑक्सिजन २.७५ ते ९.३ पट आधिक वेगाने कमी होत आहे. ऑक्सिजनच्या पातळीत होणारा हा बदल जैव विविधता आणि पाण्याच्या गुणवत्तेला प्रभावित करतो. आणि हा प्रकार वन्यजीव आणि माणसांसाठी खूपच घातक ठरू शकतो, असा इशार या अहवालात देण्यात आला आहे.

Advertisement

संशोधकांनी अमेरिकेतील काही सरोवरांचा अभ्यास केला. त्यात असे दिसून आले, की १९८० नंतर या सरोवरातील ऑक्सिजनची पातळी ५.५ ते १८.६ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. तसे पाहिले तर पाण्याची सरोवर हा सुद्धा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. या सरोवरांद्वारे वन्यप्राणी आणि माणसांना पिण्याचे पाणी मिळते. मात्र, या सरोवरांतील ऑक्सिजन कमी होण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. पाण्याच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे या समस्येवर विचार करुन ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. तापमान वाढीच्या अनेक समस्या आहेत. या सर्वच समस्या दूर करणे गरजेचे आहे. मात्र, या महत्वाच्या मुद्द्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी अनेकदा जगाला  संकटाची जाणीव करुन दिली आहे. मात्र, त्याने फारसा फरक पडलेला नाही. आजही या समस्या कायम आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply