Take a fresh look at your lifestyle.

राज्यांवर जबाबदारी ढकलणाऱ्या भाजपला काँग्रेसने सुनावले; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली. गाफील राहिल्यानेच या लाटेने देशात हाहाकार उडाला. लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले. हजारो रुग्णांचे प्राण गेले. करोनानंतर काळ्या बुरशीचा आजार आला. या आजारानेही अनेकांना संक्रमित केले, अनेकांचे प्राण गेले. इतके नुकसान झाल्यानंतरही सरकार भानावर यायला तयार नाही. ज्यावेळी लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे, नेमक्या त्याचवेळी लसी नाहीत. लसीकरणाचे नियोजनही फसले आहे, कोर्ट तर वारंवार सरकारला फटकारतच आहे. विरोधी पक्षही सरकारच्या या कारभारावर आगपाखड करत आहेत.

Advertisement

आज काँग्रेसने पुन्हा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. म्युकरमायकोसिस या घातक आजाराने नागपूरमध्ये थैमान घातले आहे. या आजाराने अनेकांचा मृत्यू झाला आहे, राज्यावर जबाबदारी ढकलू नका, औषध उपलब्ध करुन द्या, अशा शब्दात काँग्रेसने सुनावले. कोरोनाप्रमाणेच म्युकरमायकोसिसच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, या आजारावरील औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. या मुद्द्यावर नागपूर खंडपीठाने मोदी सरकारला सुनावले होते. मात्र, सरकारवर याचा काही परिणाम होत नाही. मोदी सरकारकडे करोना परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

Advertisement

देशात म्युकरमायकोसिसचा आजार वाढत आहे. राज्यातही या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. अशा स्थितीत या आजारावरल औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही, अशी राज्यांची तक्रार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे. या आजारावरील औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. कोरोना काळात केंद्र सरकारने अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका काँग्रेस करत आहे. लसींची कमतरता, लसीकरणाचे नियोजन, कोरोना मृतांची आकडेवारी, जीडीपीतील घसरण, महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ या मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका होत आहे. आणि ते सहाजिकच आहे, कारण, देशात या समस्या आहेतच. विशेष म्हणजे, या समस्या रोजच वाढत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार अजूनही गांभीर्याने विचार करायला तयार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे विरोधक सुद्धा टीका करत आहेत. इंधनाचे दर वेगाने वाढत आहेत. या दरवाढीच्या निषेध करण्यासाठी काल काँग्रेसने मुंबई शहरात मोठा मोर्चा काढला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply