Take a fresh look at your lifestyle.

खरीपात शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, कसे ते तुम्हीच पाहा..?

नवी दिल्ली : खरीप हंगामाला सुरवात झाली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहेत. बि-बियाणे (Seeds), खते (Fertilizers), औषधे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या खरीप हंगामात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, शेतकऱ्यांना हे बियाणे कसे मिळेल, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर ही बातमी वाचा..

Advertisement

केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्याने डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढविण्यावर भर देत आहे. त्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना डाळी आणि तेलबियांचे उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमास ‘मिनी कीट’ कार्यक्रम (Mini kit Programme) असे नाव दिले आहे.

Advertisement

राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NCS), नाफेड (Nafed) आणि गुजरात राज्य बियाणे कॉर्पोरेशन यांसारख्या राष्ट्रीय संस्थांकडून शेतकऱ्यांना हे ‘मिनी किट’ पुरविले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशनच्या माध्यमातून केंद्र सरकार त्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत करीत आहे. कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बियाण्यांच्या या ‘मिनी किट’ कार्यक्रमाची सुरुवात केली. कृषिमंत्री तोमर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना डाळी आणि तेलबियांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

Advertisement

केंद्र सरकारने 2014-15 पासून डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनवाढीवर लक्ष दिले आहे. 2014 -15 मध्ये तेलबियांचे उत्पादन 2.751 कोटी टन होते. ते 2020-21 मध्ये 3.657 कोटी टनांपर्यंत वाढले. याच काळात डाळीचे उत्पादन 1.715 कोटी टनांवरून 2.556 कोटी टनांपर्यंत वाढले आहे.

Advertisement

15 जूनपर्यंत वाटप
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत डाळीचे एकूण 20,27,318 मिनी किट, सोयाबीनचे आठ लाखांहून अधिक मिनी किट, तसेच शेंगदाण्याचे 74,000 मिनी किट शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहेत. मोफत बियाणे वाटपाचा हा कार्यक्रम 15 जून 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. जेणेकरून खरीपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना हे बियाणे मिळतील.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply