Take a fresh look at your lifestyle.

फडणविसांनी ठाकरे सरकारला विचारले ‘ते’ कळीचे मुद्दे; पहा नेमका काय हाणलाय टोला..!

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन मागे घेण्याबाबत राज्य सरकार गोंधळात पडले आहे. आधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात अनलॉकची घोषणा केली. त्यानंतर यात गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर काहीच वेळात राज्यातील निर्बंध कायम असून अनलॉकचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले. राज्य सरकारच्या या स्पष्टीकरणावरुन राज्यात तुर्तास अनलॉक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या कारभारावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. राज्यभरात सुद्धा नागरिकांत याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे.

Advertisement

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर राज्य सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले, की ‘काय सुरू, काय बंद ?, कुठे आणि केव्हापर्यंत ?, लॉक की अनलॉक ?, पत्रपरिषद की प्रेस रिलीज ?, अपरिपक्वता की श्रेयवाद ?’ फडणवीस यांनी असे प्रश्न विचारुन एक प्रकारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. भाजपच्या अन्य नेत्यांनीही सरकावर टीका केली आहे. राज्य सरकारच्यावतीने मंत्री वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेच अनलॉकचा निर्णय जाहीर केला होता. पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांच्या आत व्याप्त असतील अशा जिल्ह्यात पूर्ण अनलॉक करण्यात येणार आहे. पाच टप्प्यात कशा पद्धतीचे नियोजन आहे, याचीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली होती. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र काही वेळातच राज्य सरकारने स्पष्टीकरण देत राज्यातील निर्बंध उठवलेले नाहीत. अनलॉकबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे सांगितले. राज्य सरकारने स्पष्टीकरण दिल्याने आता राज्यात तुर्तास अनलॉक होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Advertisement

यानंतर मंत्री वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले, की राज्यातील अनलॉकचा येथे प्रश्नच येत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. दरम्यान, या मुद्द्यावर राजकारण सुरू झाले आहे. विरोधक तर टीका करत आहेत. नागरिकांत सुद्धा याचीच चर्चा  सुरू आहे. विरोधी पक्षांचे नेते प्रश्न विचारुन सरकारच्या या कारभारावर टीका करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply