Take a fresh look at your lifestyle.

सिसोदीयांनी भाजपाईना दिलाय ‘तो’ मंत्र; पहा लसटंचाईबद्दल नेमके काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली : करोना लसींच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांचा वाद अजूनही सुरुच आहे. देशातील नागरिकांच्या लसीकरणसाठी ३६ हजार कोटी रुपये तरतूद करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. विरोधी पक्ष आता सरकारला या पैशांची आठवण करुन देत आहेत. या मुद्द्यावर सरकारला जाबही विचारत आहेत. काँग्रेस पक्षाने यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारले होते. त्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही याच मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरले आहे.

Advertisement

भाजप नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना सिसोदिया यांनी केंद्र सरकारला लसीकरणाबाबत प्रश्न विचारले. त्यांनी म्हटले, की ‘या पत्रकार परिषदेत पात्रा यांनी फक्त केजरीवाल यांच्यावर टीका करण्याचे काम केले. यावरुन हे स्पष्ट होते की केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडे कोरोनावर मात करण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. आम्हाला असे वाटले होते, की ते लसीकरणाचे काय नियोजन आहे ?, मॉडर्ना कंपनीची लस किती दिवसात मिळेल ?, लसीकरणासाठी ज्या ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले जात आहे, त्याबद्दल सांगतील की या लसी किती दिवसात मिळतील.’ ते पुढे म्हणाले, की ‘सध्या भाजपने एक ट्रेंड सेट केला आहे. जर आम्ही त्यांना विचारले, की लसी केव्हा मिळतील, तर त्यांच्याकडून उत्तरात मात्र केजरीवाल यांच्यावर टीका केली जाते. त्यांना तसे वाटत असेल तर ठीक आहे. पण, त्यांनी आता लसी तर द्याव्यात. लोकांना लसीकरण करायचे आहे. आज देशच केंद्रातील सत्ताधाऱ्यांना विचारत आहे, की देशाच्या लसी कुठे गेल्या ?, विदेशांना लसी का विकल्या ?, या लसींचे किती पैसे घेतले ?,  याची उत्तरे देशातील जनतेला मिळाली पाहिजेत.’

Advertisement

करोना प्रतिबंधक लस तयार होऊन आठ महिने झाले तरी सुद्धा लस मिळत नाहीत. सरकारही याबाबत कार्यवाही करत असल्याचे दिसत नाही. ३६ हजार कोटींच्या लसी कुठे आहेत ?, राज्यांना लसी मिळत नसताना खासगी दवाखान्यांना लसी कशा मिळत आहेत ?, यामागे नेमके काय कारण आहे ?, याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागेल,’ असे सिसोदिया यांनी सांगितले. लसीकरणासाठी आज जास्तीत जास्त लसींची गरज आहे. ही गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात यायला हवी. भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारला समजावून सांगावे, असे उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply