Take a fresh look at your lifestyle.

करोना गोंधळात प्रशासकीय गोंधळही; म्हणून तुर्तास अनलॉक नाही

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन मागे घेण्याबाबत राज्य सरकार गोंधळात पडले आहे. आधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकची घोषणा केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच निर्बंध अद्याप मागे घेतलेले नाहीत, असे राज्य सरकारला स्पष्ट करावे लागले. त्यामुळे राज्य सरकारच्या घटक पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारने असे नवे स्पष्टीकरण दिल्याने राज्यात तुर्तास अनलॉक होणार नसल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

राज्यातील कोरोनाचा धोका अजून कायम आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी संसर्ग वाढत आहे. करोनाचे घातक व बदलते रुप विचारात घेऊनच निर्बंधात सवलत द्यायची किंवा कसे, याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यातील निर्बंध अजून उठवलेले नाहीत. ब्रेक द चेन अंतर्गत काही सवलती देण्यात येत आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे निश्चित करण्यात येत आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असे निकष ठरवण्यात येत आहेत. या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे देण्यात येतील, असे राज्य सरकारने म्हटले आहे. याचाच अर्थ असा, की आता शासन निर्णय आल्यानंतरच याबाबत निश्चित माहिती मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या प्रशासकीय घटकांकडून आढावा घेऊन याबाबत अंमलबजावणी करण्याचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून आधिक माहिती घेण्यात येत आहे. त्यानंतरत अधिकृत निर्णय कळवला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी मंत्री वडेट्टीवार यांनी राज्यात पाच टप्प्यात अनलॉक केले जाणार आहे. ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांच्या आत व्याप्त असतील अशा जिल्ह्यात पूर्ण अनलॉक करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच पाच टप्प्यात कशा पद्धतीचे नियोजन आहे, याचीही माहिती दिली होती. तसेच या निर्णयाची उद्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. यानंतर काही वेळातच राज्य सरकारने स्पष्टीकरण देत अनलॉकचा कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात तुर्तास अनलॉक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनलॉकबाबत काहीच स्पष्ट नव्हते तर मग वडेट्टीवार यांनी थेट निर्णयच कसा जाहीर केला, राज्य सरकारमध्ये समन्वय राहिला नाही का, असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply