Take a fresh look at your lifestyle.

काळजी घ्या रे.. ‘या’ भागात आहेत सर्वाधिक करोनारुग्ण मुले; पहा सीरो सर्व्हेची आकडेवारी

मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले. या लाटेचा वेग इतका जबरदस्त होता की, एकाच दिवसात चार लाख लोक संक्रमित होत होते. लहान मुलेही कोरोनाच्या विळख्यात अडकली. तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका राहील, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र, दुसऱ्याच लाटेत हजारो लहान मुलांना कोरोनाने संक्रमित केले. धक्कादायक म्हणजे, एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच देशातील दोन राज्यात तब्बल ९० हजार मुले कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

तेलंगाणा राज्यात या वर्षात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात ३७ हजार ३३२ मुले कोरोना बाधित झाली आहेत. यामध्ये १९ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. तेलंगाणाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. याआधी पहिल्या लाटेत ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० या काळात राज्यातील १९ हजार ८२४ मुले कोरोना संक्रमित झाली होती. तेलंगाणा प्रमाणेच मध्य प्रदेश राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतच मुलांना कोरोनाने गाठले. या राज्यात १८ वर्षांपर्यंतचे तब्बल ५४ हजार मुले कोरोना बाधित झाली आहेत. यातील जवळपास १२ हजार मुलांना दवाखान्यात दाखल करावे लागले होते.

Advertisement

सीरो सर्वेनुसार आजमितीस देशातील ४० टक्के मुलांना कोरोनाने संक्रमित केले आहे. पहिल्या लाटेत १५ टक्के मुले कोरोना संक्रमित होती. दुसऱ्या लाटेत मात्र हे प्रमाण दुपटीने वाढले. दुसऱ्या लाटेत जवळपास २५ टक्के मुले कोरोनाच्या विळख्यात सापडली. आणि आता तर तिसऱ्या लाटेत उर्वरीत ६० टक्के मुलांना धोका राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे, की तिसरी लाट खूपच घातक ठरू शकते. या लाटेचा जास्त परिणाम मुलांवर झाला तर परिस्थिती खूपच गंभीर होऊ शकते. कारण, मुलांच्या उपचारासाठी आयसीयु, पीआयसीयु दवाखान्यात असणे गरजेचे आहे. आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा विचार केला तर काही मोठी शहरे सोडली तर अशी व्यवस्था देशात कुठेही नाही.

Advertisement

एकूणच, देशात आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. तिसरी लाट केव्हा येणार याबाबत काहीच सांगता येणार नाही. तसेच या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होईल, असे काही पुरावे अद्याप तरी समोर आलेले नाहीत, असे केंद्र सरकारने याआधीच स्पष्ट केले होते. मात्र, आता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत दोन राज्यातच ९० हजार मुले कोरोना बाधित झाल्याचे सर्वेतूनच समोर आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply