Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून भुजबळ बनले होते व्यापारी इक्बाल शेख; पहा बाळासाहेब ठाकरेंनी काय आदेश दिला होता त्यांना

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal and iqbal sheikh) हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले ते कार्यकर्ते. त्यांनीच आता एक महत्वाची आठवण ट्विटरवर शेअर केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व्यापारी इक्बाल शेख बनून त्यांनी केलेल्या क्रांतिकारी आंदोलनाची ही आठवण आहे.

Advertisement

भुजबळ यांनी म्हटलेय की, कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी ४ जून १९८६ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने वेशभूषा करून बेळगावात आंदोलन केले होते. आज त्याला ३५ वर्ष पुर्ण होत आहेत. महाराष्ट्रातुन येण्याचे मार्ग बंद केल्यानंतर गोवा मार्गे वेशभुषा करून बेळगावात दाखल झालो.

Advertisement

Chhagan Bhujbal on Twitter: “कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी ४ जून १९८६ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने वेशभूषा करून बेळगावात आंदोलन केले होते. आज त्याला ३५ वर्ष पुर्ण होत आहेत.महाराष्ट्रातुन येण्याचे मार्ग बंद केल्यानंतर गोवा मार्गे वेशभुषा करून बेळगावात दाखल https://t.co/iukiq2YwZj” / Twitter

Advertisement

दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा मी केली होती. बेळगावात दाखल झाल्यावर आम्ही आंदोलन केले,यानंतर आम्हाला अटक झाली होती.धारवाडच्या तुरूंगात दोन महिने काढल्यानंतर आमची सुटका झाली. यावेळी माझ्यासोबत दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक व असंख्य शिवसैनिक होते. प्रमोद नलावडे यांनी वेशभूषा करण्यात मला मदत केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply