Take a fresh look at your lifestyle.

वर्षात लाखाचे 13 लाख.. शेअर बाजारात ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार झालेत मालामाल..!

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुक म्हणजे जोखमीचे काम. पण ‘डर के आज जीत है..’ हा दृष्टिकोन ठेवणारेच त्यात यशस्वी होतात. काही शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करतात, तर काही कंगाल.. सध्या शेअर बाजार विक्रमी पातळीवर आहे. अशाच एका शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली. अवघ्या वर्षभरात गुंतवणुकदारांना लाखाचे 13 लाख रुपये मिळाले.

Advertisement

सीजी पॉवर अॅंड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स (CG Power & Industrial solutions) असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना वर्षभरात १,२८५ टक्क्यांचा घवघवीत परतावा दिला. सीजी पॉवर अॅंड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स कंपनीच्या एका शेअरची किंमत (Share price) 3 जून 2020 रोजी 6.30 रुपये होती. ती काही दिवसांपूर्वीच 87.30 रुपये पातळीवर पोचली होती. म्हणजेच, या कंपनीत वर्षभरापूर्वी गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे आता जवळपास १३ लाख रुपये झाले आहेत.

Advertisement

मागील काही महिन्यातच या कंपनीच्या शेअरने 90 टक्के वाढ नोंदविली. या शेअरने 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांची उच्चांकी वाढ नोंदवली. मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत देशांतर्गत गुंतवणुकदार, परकी गुंतवणुकदार आणि प्रमोटर्सनी आपला हिस्सा ‘सीजी पॉवर अॅंड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स’मध्ये वाढविला. ‘सीजी पॉवर’च्या व्यवस्थापनातही बदल झाले आहेत. मुरुगप्पा समूहाने सीजी पॉवरचे अधिग्रहण केले आहे.

Advertisement

डिसेंबर 2019 अखेर कंपनीने 210 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता, तर डिसेंबर 2020 अखेर कंपनीने 534 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला. ऑगस्ट 2020 मध्ये सीजी पॉवर आणि मुरुगप्पा समूहाने आपल्या कर्जाची पुनर्रचना केली. नोव्हेंबर 2020 मध्ये ‘ट्युब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया’ने ‘सीजी पॉवर अॅंड इंडस्ट्रियल सोल्युशन्स’चा 50.62 टक्के हिस्सा विकत घेतला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply