Take a fresh look at your lifestyle.

म्हणून धोनीने स्कॉटलंडवरुन मागवला ‘हा’ खास प्राणी; पहा चाहते काय म्हणालेत त्यावर

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये आरामात आपला वेळ घालवत आहे. धोनीच्या बाईकवरील प्रेमाबद्दल आपण ऐकले असून धोनीला हॉर्स रायडिंगही खूप आवडते. त्याच्या फार्म हाऊसमध्ये एकापेक्षा एक सरस घोडे असून अलीकडेच धोनीने स्कॉटलंडहून एका खास घोडा मागवला आहे. महेंद्रसिंग धोनीने स्कॉटलंडच्या शेटलँड पोनी जातीचा एक अतिशय सुंदर पांढरा रंगाचा घोडा मागवला आहे.

Advertisement

Advertisement
View this post on Instagram

Advertisement

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

Advertisement

Advertisement

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉटलंडमधून आयात झालेल्या या विशिष्ट घोड्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या घोड्याची किंमत खूप जास्त आहे. महेंद्रसिंग धोनीची मुलगी जिवा हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती या शेटलँड पोनी जातीच्या घोड्याशी खेळताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून इन्स्टाग्रामवर या फोटोवर सतत भाष्य केले जात आहे.
या घोड्याचे वय सुमारे २ वर्षे असून तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हा घोडा जगातील सर्वात लहान जातींपैकी एक आहे. या घोड्याची उंची सुमारे ३ फूट आहे. या घोड्यास जास्त वेग नाही, परंतु त्याच्या सौंदर्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत खूप जास्त आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply