Take a fresh look at your lifestyle.

पहिल्याच कसोटी डावात ठोकले लॉर्ड्सवर द्विशतक; पहा कोणत्या खेळाडूने केली ही कमाल..!

मुंबई : न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हन कॉनवेची गुरुवारपासून क्रिकेटविश्वात चर्चा आहे. कॉनवेने लॉर्ड्स येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आणि त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावले आहे. यासह, डेव्हन कॉनव कसोटी इतिहासातील जवळपास १४४ वर्षांच्या इतिहासात पहिल्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा केवळ जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

Advertisement

डेव्हन कॉनवेने असे पराक्रम केले आहेत, जे एव्हरेस्ट चढण्यासारखे कोणत्याही फलंदाजासाठी आव्हानात्मक असेल. डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात २०० धावा केल्या. षटकार खेचून दुहेरी शतक पूर्ण करणारा डेव्हन कॉनवे धावबाद झाला. न्यूझीलंडचा पहिला डाव ३७८ धावात संपुष्टात आला. डेव्हनने केवळ पहिल्या कसोटीतच नव्हे तर पहिल्या डावातही शतक झळकावले असून कोणत्याही युवा फलंदाजासाठी त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात २०० धावा ओलांडणे हे अग्नीदिव्य असेल.
पहिल्या कसोटी डावात सर्वोत्तम धावा करणारे कोण आहेत हे जाणून घेऊया..

Advertisement

१) डेव्हन कॉनवे (२०० धावा) २०२१
२) एडेन मार्क्राम (९७) २०१७
३) अब्दुल कादिर (९५) १९६४
४) गॉर्डन ग्रीनिज (९३) १९७४

Advertisement

हा विक्रम मोडीत काढण्यासाठी कोणत्याही फलंदाजाला अग्निदिव्य पार करावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील सर्वोत्कृष्ट स्कोअरचा हा विक्रम आहे. डेव्हन कॉनवेने जवळजवळ ९० वर्षांच्या अंतरानंतरचा विक्रम मोडला.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात कोणत्या फलंदाजांनी किती धावा केल्या आहेत ते पाहुया
२०० कॉनवे (इंग्लंड) २०२१
१७६ जॉर्ज हेडली (विंडीज) १९३०
१७१ हमीश रदरफोर्ड (न्यूझीलंड) २०१३
१६५* चार्ल्स बॅनरमॅन (ऑस्ट्रेलिया) १८७७
१६४ आर्ची जॅक्सन (ऑस्ट्रेलिया) १९२९.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply