Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. पुरुष घाबरलेत की.. ‘कृषीसाधना’ करणाऱ्या महिलांवर लासलगावच्या व्यापाऱ्यांचा बहिष्कार..!

नाशिक : कोणत्याही सेक्टरमध्ये घराणेशाही किंवा लॉबिंग ही ठरलेली आहे. त्या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना त्रास देणे किंवा बहिष्कार टाकण्याचे जालीम औषध जुने प्रस्थापित ठेकेदार त्यासाठी वापरतात. त्यातही महिला जर पुढे येत असतील तर त्यांना रोखणारी मनुवादी मानसिकता ठासून भरलेला समाज आणखीनच आक्रमक होतो. तसलाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कांदा मार्केट असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडला आहे. त्यामुळे एकूणच कृषी मार्केटींग सेक्टरसह महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Advertisement

कृषीसाधना महिला सहकारी संस्थेतर्फे कांदा खरेदी करण्यास सुरुवात झाल्यावर पुरुषी मानसिकतेच्या व्यापाऱ्यांचा अहंगंड दुखावला असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. नवी दिल्ली येथील इफको संस्थेच्या पहिल्या महिला संचालिका आणि विंचूर विकास सोसायटीच्या अध्यक्ष असलेल्या साधना जाधव यांची ही संस्था आहे. नाफेडच्या वतीने कांदा खरेदीचे टेंडर मिळूनही लासलगावच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांच्या खरेदीला आक्षेप घेऊन कांदा लिलावावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, काही व्यापारी आणि बाजार समितीने त्यांना नाफेडचे पत्र दाखवण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत.

Advertisement

याबाबत साधना जाधव यांनी म्हटले आहे की, नाफेडने ग्रामीण भागातील छोट्या संस्थेला म्हणून कृषीसाधना संस्थेला कांदा खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे. विंचूर येथे लिलावात सहभागी होण्यासाठी परवानगी मिळाली. मात्र, लासलगाव येथील स्थानिक व्यापारी असोसिएशनचे सभासद नसल्याचे कारण देऊन लिलाव साेडून निघून जातात. महिलांच्या संस्थेला अशाप्रकारे पुरुष व्यापाऱ्यांकडून विरोध होत असेल, तर ते निश्चितच वेदनादायी आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आणि बाजार समितीला शोभणारे नाही.

Advertisement

सुवर्णा जगताप (अध्यक्ष, लासलगाव बाजार समिती) यांनी म्हटले आहे की, कृषीसाधना संस्थेने नाफेडतर्फे कांदा खरेदी करीत असल्याचे आम्हाला तोंडी सांगितले आहे. त्यांनी लेेखी पत्र आणावे, तेव्हा आम्ही त्यांना लिलावात सहभागी होण्याची संधी देेऊ. तर, नंदकुमार डागा (अध्यक्ष, लासलगाव व्यापारी असोसिएशन) यांनी म्हटलेय की, खरेदीची परवानगी नेमकी कुणाला दिली, याचा लेखी पुरावा हवा. स्थानिक असोसिएशन सगळ्या बाजार समित्यांमध्ये आहे. लासलगावच्या व्यापाऱ्यांना यासाठी बदनाम करू नये.

Advertisement

कांदा खरेदीचा परवाना बाजार समिती देते, मात्र नवीन व्यापारी असोसिएशनचा सभासद नसल्याचे घटनाबाह्य कारण पुढे करून त्रास देत असल्याचे हे काही पहिले उदाहरण नाही. त्याचाच फटका फटका कृषी साधना शेतीमाल उत्पादक महिला सहकारी संस्थेला गुरुवारी बसला आहे. त्यामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कुठलाही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमाल खरेदी करू शकतो. कृषीसाधना संस्थेलाही लासलगाव बाजार समितीतर्फे कांदा खरेदीचा परवाना देण्यात आला आहे, मग अशाप्रकारे स्थानिक असोसिएशनच्या सदस्यत्वाच्या कारणाला कायदेशीर आधार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply