Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. जगावर घोंघावतेय ‘हे’ही संकट; कोट्यावधीना बसणार फटका..!

दिल्ली : कोरोनाचा त्रास अवघ्या जगालाच होत आहे. कोणताही देश असो तेथे या आजाराने थैमान घातले आहेच. अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्या. गरीबी वाढली. महागाईत वाढ झाली. व्यापाराचे नुकसान झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले. भारतातही कोट्यावधी लोकांनी आपले रोजगार गमावले. मात्र, बेरोजगारीचे संकट जगावरच आले आहे. होय, याचे संयुक्त राष्ट्रांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात तब्बल २० कोटी लोक बेरोजगार होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

कोरोनाने बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण केली आहे. या महामारीच्या काळात जवळपास सर्वच देशांचे उत्पन्न घटले आहे. श्रीमंत देश यातून सावरले आहेत. मात्र, गरीब आणि विकसनशील देश मात्र अजूनही या संकटातून बाहेर पडलेले नाहीत. एकट्या भारतातच एक कोटी पेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत. जागतिक रोजगार आणि सामाजिक परिदृश्य परिणाम २०२१ या अहवालात असे म्हटले आहे, की आतापर्यंत ११ कोटी कामगार गरीब किंवा अत्यंत गरीबांच्या यादीत आले आहेत. या महामारीचा रोजगारांवर मोठा परिणाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या काळात देशांच्या सरकारांनी ठोस निर्णय घेण्याचे धाडस दाखवले नाही त्यामुळे या महामारीने थैमान घातले. आता करोना नियंत्रणात येत असला तरी या महामारीचा परिणाम आणखी काही वर्षे जाणवणार आहे. तो इतक्यातच कमी होईल असे नाही. कारण, या आजाराने आज ज्या काही समस्या निर्माण केल्या आहेत, त्यांचे निवारण करण्यासाठी काही वेळ तर द्यावाच लागणार आहे.

Advertisement

करोनामुळे नजीकच्या काळात बेरोजगारीच्या समस्येत वाढ होण्याचा अंदाज आहे. २०२१ या वर्षात ७.५ कोटी तर २०२२ मध्ये २.३ कोटी बेरोजगार होतील. तसेच रोजगार आणि कामकाजाच्या वेळात कपातीमुळे बेरोजगारीचे सकंट आधिकच गडद होत जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. एकूणच, जगासाठी सध्याचा काळ संकटांचा आहे. कधी विचारही केला नसेल अशी संकटे या कोरोनाने आज निर्माण केली आहेत. समस्या आहेत म्हणून त्या मिटवायच्या नाहीत, असेही नाही. या परिस्थितीत आता ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विकसित देश यातून लवकर मार्ग काढतील पण, अन्य देशांना मात्र संघर्ष करावा लागणार आहे. कारण, या देशात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. कोरोना बरोबरच दुसऱ्या समस्या दूर करण्यासाठी या देशांना आता आधिक वेगाने आणि ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply