Take a fresh look at your lifestyle.

नगरमध्ये होणार ‘इतके’ टक्के पाऊस; पहा नेमका काय आहे साबळे मॉडेलचा हवामान अंदाज

अहमदनगर : मॉन्सूनचे आगमन होत असतानाच अहमदनगर, नाशिक, खानदेश आणि मराठवाडा भागात पाऊस कमी होणार असल्याचे सुधारित हवामान अंदाजामध्ये भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचवेळी कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक व ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी नगर जिल्ह्यात 98 टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Advertisement

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. साबळे 8 वर्षांपासून दरवर्षी राज्यातील मान्सूनचा अंदाज वर्तवतात. त्यांचे हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या प्रत्येक विभागातील जिल्ह्यांतील हवामानविषयक घटकांच्या निरीक्षण, नोंदीवरून हा अंदाज वर्तवण्याची कार्यवाही करावी लागते. वेगवेगळ्या विभागांतील 15 जिल्ह्यांच्या गेल्या 30 वर्षांतील हवामानविषयक नोंदींवर हे मॉडेल आधारित आहे. जानेवारी ते एप्रिल या काळातील कमाल-किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांचे निरीक्षण व नोंदीवरून हा अंदाज बांधला जातो.

Advertisement

डॉ. साबळे म्हणतात की, यंदा राज्यात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून गुजरातच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. 10 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. जून-जुलैमध्ये पावसात मोठे खंड तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यांनी सांगितलेले मुद्दे असे :

Advertisement
दापोली, पुणे, राहुरी (नगर), कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. 
राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील. 
पेरणी करताना त्या भागात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पुरेसा ओलावा लक्षात घेऊन पेरणी करावी. 
शक्यतो आंतरपीक पद्धतीला प्राधान्य द्यावे.
विविध हवामान घटक निरीक्षण कालावधीत अकोला, पाडेगाव, निफाड येथे वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने या ठिकाणी जून-जुलैमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply