Take a fresh look at your lifestyle.

पुनावालांनी लावले ‘तिकडे’ही डोकं; पहा कशासाठी केलाय DCGI अर्ज

पुणे : कोरोनावरील कोविशील्ड लसींचे उत्पादन करून अवघ्या जगाला लसपुरवठा करणाऱ्या सुप्रसिद्ध उद्योगपती आदर पूनावाला यांनी आता नवी झेप घेण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आहे.  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसींच्या उत्पादनासाठी औषध महानियंत्रकांकडे (DCGI) अर्ज केला आहे.

Advertisement

ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्याकडून संशोधित केलेली ऍस्ट्राझेनेका लस भारतात कोविशील्ड नावाने सीरम उत्पादन करीत आहेत. त्या लसला खूप मोठे प्रमाणात मागणी आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देत असतानाच रशिया देशात उत्पादित केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ लस निर्मितीसाठीदेखील अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून (Dr. Reddy’s Lab) करण्यात येत आहे. मात्र, देशातील लसची गरज लक्षात घेऊन आणि जगभरातील मागणी लक्षात घेऊन पूनावाला यांनी यासाठीही तयारी केली आहे.

Advertisement

जगातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी असा पुण्यात मुख्यालय असलेल्या सीरमचा लौकिक आहे. डीसीजीआयने सीरमला स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्यास लसींचे उत्पादन अतिशय गतीमान होईल. ‘स्पुटनिक व्ही’ ही येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना उपलब्ध होणार आहे. अपोलो रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध होईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply