Take a fresh look at your lifestyle.

सावधान, शिक्षक भरतीची ‘ती’ जाहिरात संभ्रमित करणारी; शिक्षण परिषदेने केलेय ‘हे’ आवाहन

मुंबई : सर्व शिक्षा अभियानासोबत नाम साध्यर्म असणारे http://shikshaabhiyan.org.in/index.php या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यातआलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी, समग्र शिक्षा योजनेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी एका पत्राद्वारे केला आहे. यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वृत्त विविधप्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाले होते.

Advertisement

संबंधित (http://shikshaabhiyan.org.in/index.php) संकेतस्थळावर Sarva Shiksha Abhiyan Recruitment २०२१ या मथळ्याने Primary Teacher, Junior Teacher, Karyalaya Staff, Chaprasi या पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे संकेतस्थळावर दिसून येते. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान केंद्र पुरस्कृतयोजनेची सन २००२-०३ पासून सन २०१७-१८ पर्यंत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय या विभागाच्याअधिनस्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यभर अंमलबजावणी करण्यातयेत होती.

Advertisement

सद्य:स्थितीत सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण यापूर्वाश्रमीच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या एकत्रिकीकरणातून दिनांक ०१/०४/२०१८ पासून समग्र शिक्षा योजनेचीअंमलबजावणी  या कार्यालयामार्फत राज्यात सुरू आहे. त्यामुळे सन २०१७-१८ (दि. ३१/०३/२०१८) नंतर सर्वशिक्षा अभियान या योजनेची वेगळ्याने अंमलबजावणी राज्यात सुरू नाही. असेही द्विवेदी यांनी याखुलाश्याद्वारे स्पष्ट केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply