Take a fresh look at your lifestyle.

रिलायन्सचेही टाटांच्या पावलावर पाउल; पहा कोणता दिलासादायक निर्णय घेतलाय अंबानींनी

दिल्ली : कोरोनाच्या संकटाने देशाचे मोठे नुकसान केले. या घातक विषाणूने लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत. घरातील कर्ती मंडळीच या आजाराने हिरावून नेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळलाा. आता पुढे काय, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांना सतावत आहे. सरकारी कर्मचारी असेल तर त्याला सरकारी मदत मिळते. पण, खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे काय, त्यांच्या कुटुंबियांचे काय, असा प्रश्न आहेच. यावर सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

देशातील काही मोठ्या खासगी कंपन्या मात्र या संकटाच्या काळात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करत आहेत. यआधी टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असाच दिलासादायक निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार कोविड १९ मुळे कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या ६० वर्षांपर्यंतचा पगार कंपनी संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना देणार आहे. तसेच मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी करणार आहे. त्यानंतर आता देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनेही कर्मचाऱ्यांसाठी असाच दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात कंपनीने म्हटले आहे, की कोविड १९ मुळे कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कंपनी संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पुढील पाच वर्षे पगार देणार आहे. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी सुद्धा कंपनी मदत करणार आहे. कंपनीने आरोग्य विम्याचीही तरतूद केली आहे. एखादा कर्मचारी किंवा त्यांच्या घरातील सदस्य कोरोना संक्रमित असतील तर अशा वेळी या आजारातून पूर्णपणे बरे होईपर्यंत कर्मचारी विशेष रजा घेऊ शकतात, असे कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटात देशातील खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे काही कंपन्या अशाही आहेत, की त्यांनी या संकटात संधी साधली आहे. कोणताच विचार न करता मनमानीपणे कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले आहेत. दरम्यान, देशात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी हा घातक आजार अजून नियंत्रणात आलेला नाही. राज्यांनी लॉकडाऊन वाढवले आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंधात काही सवलतीही दिल्या आहेत. आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात या आजाराचा धोका वाढण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे भविष्यातील धोक्याचा अंदाज घेत राज्य सरकारे नियोजन करत आहेत. त्यामुळेच राज्यांनी लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेतलेला नाही. काही सवलती मात्र दिल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply