Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधी यांनी दिलेय केंद्र सरकारला प्रत्युत्तर; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी आरोग्याबाबत

 

Advertisement

दिल्ली : करोनामुळे देशात आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. याची माहिती केंद्र आणि राज्य सरकार रोजच देत असतात. आता मात्र मृत्यूंच्या या आकडेवारीवरही राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस मोदी सरकारवर तर ज्या राज्यात काँग्रेस किंवा अन्य पक्षांची सत्ता आहे, तेथे भाजप या मुद्द्यावर राज्य सरकारवर आरोप करत आहे.

Advertisement

या आरोपांमुळे काँग्रेसशासित राजस्थान सरकारने करोना काळातील सर्वच मृत्यूंचे ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करोना मृतांची खरी आकडेवारी देत नसल्याचा आरोप केला होता. राजकीय विश्वात असे आरोप-प्रत्यारोप होत असल्याने आता जनतेच्या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज याच मुद्द्यावर ट्विट करत केंद्र सरकारला घेरले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की करोनामुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंची खरी आकडेवारी केंद्र सरकार लपवत आहे. याआधी त्यांनी लसींच्या कमतरतेवरुन सरकारवर टीका केली. करोनाच्या विरोधात सर्वाधिक मजबूत रक्षा कवच फक्त लसच आहे. देशातील प्रत्येकाला लस मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि केंद्र सरकारला जागे करावे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “कोरोना महामारी के ख़िलाफ़ सबसे मज़बूत सुरक्षा कवच सिर्फ़ वैक्सीन है। देश के जन-जन तक मुफ़्त टीकाकरण पहुँचाने के लिए आप भी आवाज़ उठाइये- केंद्र सरकार को जगाइये! #SpeakUpForFreeUniversalVaccination https://t.co/SEFhwokfSU” / Twitter

Advertisement

कोरोना लस आणि लसीकरण या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी अनेक वेळा मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच करोना मृतांबाबतही गंभीर आरोप केले आहेत. देशातील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत काही दिवसांपूर्वी विदेशी माध्यमात एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालात सुद्धा भारतात करोनामुळे जितके मृत्यू झाल्याचे आता सांगितले जात आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मृत्यू झाले आहेत, असा दावा या अहवालात केला होता. त्यावेळी सुद्धा राहुल गांधी यांनी या अहवालाचा हवाला देत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तसे पाहिले तर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची माहिती केंद्र आणि राज्य सरकार रोजच देत आहेत. तरी सुद्धा या सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात होणाऱ्या मृत्यूत तफावत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने देखील असेच म्हटले होते. संघटनेने एका अहवालात म्हटले होते, की जगात करोनामुळे होणाऱ्या प्रत्येक ठिकाणच्या मृत्यूंची माहिती उपलब्ध नाही. तसेच देशांकडून दिली जाणारी मृत्यूंची माहिती त्या देशांच्या सरकारी यंत्रणांनी दिलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मात्र जगात यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू करोनामुळे झालेले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply