Take a fresh look at your lifestyle.

आलाय की ‘आदर्श घरभाडे कायदा’; पहा नेमक्या आय आहेत तरतुदी आणि कोणाला होणार फायदा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात आदर्श घरभाडे कायदा (मॉडेल टेनेन्सी अॅक्ट) मंजूर केला आहे. घरमालक व भाडेकरू यांच्या हितासाठीचा विचार करून या कायद्यात महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. घरभाड्यासंबंधीचे तंटे मिटवण्यासाठी लवाद किंवा न्यायालय स्थापन करण्याचाही प्रस्ताव यामध्ये असल्याने असे वाद टाळणे किंवा वाद झाल्यास तातडीने सोडवणे शक्य होऊ शकेल.

Advertisement

नवा कायदा लागू झाल्यानंतर घरे किंवा जागा प्रॉपर्टी बाजारामध्ये खासगी कंपन्यांची इंट्री होणार आहे. कारण, जागेला भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार प्रदान करणारा हा कायदा आहे. यामुळे लोकांना रिकाम्या जागेला भाड्याने देण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासह रेंटल हाउसिंगमध्ये खासगी व्यक्ती किंवा कंपन्यांची भागीदारी वाढेल. यासह यामधील महत्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे :

Advertisement
आता घरमालकांना भाडेकरूकडून २ महिन्यांच्या भाड्याची आगाऊ रक्कम घेता येणार नाही
भाडे थकलेले असल्यास किंवा भाडेकरू घर सोडत नसल्यास घरमालक त्याच्याकडून २ ते ४ पट भाडे वसूल करू शकतो
देशात रेंटल हाउसिंग मार्केटला गती देण्याचा या कायद्यामागील उद्देश
निवासी भाड्यासाठी दोन महिने व गैरनिवासी परिसरासाठी ६ महिन्यांपर्यंतचा अॅडव्हान्स घेण्याची मर्यादा निश्चित
नोटीस असूनही भाडेकरूने घर सोडले नाही तर मालक त्याच्याकडून पहिल्यांदा दोन महिने व त्यानंतर ४ पट भाडे वसूल करू शकणार
मालक वीज व पाण्याच्या पुरवठ्यात कपात करू शकत नाही
घरात काही दुरुस्ती किंवा काही काम करायचे असल्यास मालकाने भाडेकरूला २४ तास आधी नोटीस द्यावी

 

Advertisement

मसुदा राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पाठवला जाईल. राज्ये त्यांच्या सोयीने नव्या कायद्यात दुरुस्ती व बदल करू शकतील. सरकारने पहिल्यांदा २०१९ मध्ये या अधिनियमाचा मसुदा जारी केलेला होता. आता त्यास खऱ्या अर्थाने कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply