Take a fresh look at your lifestyle.

असे होणार अनलॉक; पहा नेमके काय नियोजन आहे ठाकरे सरकारचे

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघा भारत देश लॉक झालेला होता. महाराष्ट्र राज्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यालाच अनलॉक करण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार प्रयत्नात आहे. त्यासाठी त्यांनी आराखडा बनवून नियोजन केले आहे.

Advertisement

पाच टप्प्यात राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा १८ जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक करण्यात येणार आहे. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याबाबत महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
या १८ जिल्ह्यात होणार अनलॉक : नाशिक, जळगाव, धुळे, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त.
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्यावर.
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त.

 

Advertisement

पहा काय असतील खुले :

Advertisement
 • रेस्टॉरंट, मॉल्स
 • गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील
 • खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
 • चित्रपट शुटींगला परवानगी
 • थिएटर सुरू होतील
 • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे
 • ई कॉमर्स सुरू राहिल
 • जिम, सलून सुरू राहणार
 • पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
 • बस 100 टक्के क्षमतेने
 • आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल
 • इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील
दुसऱ्या टप्प्यातील ६ जिल्हे : अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार
तिसऱ्या टप्प्यातील १० जिल्हे : अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर
चौथ्या टप्प्यातील २ जिल्हे : पुणे, रायगड

 

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply