Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीत काँग्रेसचा झेंडा ‘वेगळा’च? पहा निवडणुकीबाबत नेमके काय म्हटलेय पटोलेंनी

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासूनच सरकार लवकरच पडेल अशा बातम्या येतच आहेत. तीन पक्षांच्या या आघाडीत अनेक वेळा मतभेदही झाले. वादही पाहण्यास मिळाले. सरकार पडेल की काय, असेही वाटत होते. मात्र, असे काही झाले नाही. अद्याप महाविकास आघाडी सरकार टिकून आहे. असे असले तरी ज्यावेळी निवडणुकांचा मुद्दा येतो, त्यावेळी आघाडीतील पक्षांचे धोरण वेगळे असते. आता हेच पहा ना, राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सध्या राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे मात्र, २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय विश्वात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशानेच राज्यात आघाडी सरकार सत्तेत आले आहे. या सरकारसाठी किमान समान कार्यक्रम देखील तयार केल्यानंतरच राज्यात तिन्ही पक्षांचे सरकार आले, असे पटोले यांनी सांगितले. मात्र, निवडणुकांच्या बाबतीत पक्षांचे धोरण वेगेळेच राहणार असल्याचे पटोले यांनी आज केलेल्या वक्तव्याद्वारे स्पष्ट झाले आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मध्यंतरी तशा बातम्या सुद्धा आल्या होत्या. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर तर वाद आधिकच वाढला होता. इतकचे नाही तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार असल्याचेही बोलले जात होते. त्यानंतर आज पटोले यांनी असे वक्तव्य केल्याने राजकीय विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

दरम्यान, याआधीही नाना पटोले यांनी असे वक्तव्य केले होते. इंदापूरमध्ये ते म्हणाले होते, की सन २०२४ च्या विधानससभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष असेल. तसेच काँग्रेस सत्तेतील प्रमुख पक्ष असेल, असेही त्यांनी त्यावेळी म्हटले होते. आता पुन्हा असेच वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अद्याप महाविकास आघाडीतील कोणीही प्रतिक्रिया दिलेलली नाही. तसेच विरोधी पक्ष भाजपनेही अद्याप या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply