Take a fresh look at your lifestyle.

‘तितकी’ झोप महत्त्वाचीच; आणि चॉकलेट-बिस्किटे खाण्याची इच्छा होत असल्यास सावध व्हा..!

दिल्ली : चॉकलेट-बिस्किटे आणि चिप्स खाण्याची सवय असेल किंवा अशा गोड आणि चरबी वाढवणाऱ्या गोष्टी खाण्यासाठी जीभ वळवळ करीत असेल तर आपण सावध व्हायला पाहिजे. कारण जिभेचे हे चोचले पुरवण्याच्या नादात आपण थेट रक्तदाब व कोलेस्ट्रॉल वाढवून घेऊन दयविकार तसेच पक्षाघात या आजाराचे गंभीर रुग्ण बनू शकता. लंडन येथील किंग्ज कॉलेज यांच्या निद्रानाश या विषयावरी संशोधनातून ही आणि अशीच धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

Advertisement

तणाव व कमी झोपेमुळे वजन आणि कंबरेचा घेर आटोक्यात आणण्यामध्ये अनेक अडचणी येतात. उलट अशा व्यक्तींना चॉकलेट, बिस्कीटसारख्या फॅट्स व गोड पदार्थ (जास्त कॅलरी असलेले) खाण्याची तीव्र इच्छा होते. त्याने आणखी वजन आणि चरबी वाढत राहते. कमी झोपेमुळे लठ्ठपणा वाढून ब्लड शुगरच्या पातळीत वाढ, कामाचा मूड, स्मरणशक्ती व एकाग्रतेवर परिणाम होतो. यासह इतर महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
तणाव आणि निद्रानाशामुळे शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडतो
रक्तशर्करा व कंबरेजवळ अतिरिक्त चरबी साठण्याची शक्यता वाढते
सात तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांत लठ्ठपणा आणि मधुमेहाचा जास्त धोका
अपुऱ्या झोपमुळे भूकेशी संबंधित हार्मोनमध्ये बदल
पोट नेहमीच रिकामे असल्याचे वाटल्याने गोडधोड खाण्याची अतीव इच्छा
थकल्यानंतर भूकेशी संबंधित हार्मोन तसेच त्याच्याशी निगडित मंेदूतील भागही सक्रिय होऊन खायला मागतात
आजारांपासून दूर राहण्यासाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे पुरेशी झोप आणि तणावमुक्त राहणे

 

Advertisement

एकूणच आपल्याला मानसिकदृष्ट्या सशक्त वाटेल आणि मनाला फ्रेश वाटून कामात अजिबात अडचणी जाणवणार नाहीत इतके तास झोप सर्वच व्यक्तींनी घ्यावी. त्यासाठी प्रतिदिन किमान 7 तासांची झोप हा दिनक्रम असावा. असे न केल्यास कॉर्टिसोलही (तणावाशी संबंधित हार्मोन) शुगरची पातळी वाढून स्नायू व उतींना इन्शुलिन प्रतिरोध निर्माण होतो. यकृतालाही रक्तात जास्त शुगर सोडण्यासाठी उत्तेजित करून यामुळे शारीरिक समस्या वाढत राहतात.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply