Take a fresh look at your lifestyle.

सोन्याची झळाळी उतरली, चांदीच्या दरातही माेठी घसरण, पाहा कशामुळे झाली किंमतीत घट..?

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसला. देशाची राजधानी दिल्लीत आज (गुरुवारी) सोन्या-चांदीच्या किंमतीत घट दिसून आली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत तोळ्यामागे 339 रुपयांची घट झाली. त्यामुळे दिल्लीतील सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,530 रुपयांवर आली. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 48,869 रुपये होता.

Advertisement

‘एचडीएफसी सिक्युरिटीज’च्या मते चांदीच्या किंमतीत प्रति किलोमागे 475 रुपये घसरण झाली. त्यामुळे शहरातील चांदीचा दर प्रति किलो 70,772 रुपयांवर आला. मागील सत्रात म्हणजेच बुधवारी शहरातील चांदीचा दर (Silver Rate) 71,247 रुपये प्रतिकिलो होता.

Advertisement

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर प्रति औंस 1,893 वर घसरला. चांदीची किंमत प्रति औंस 27.79 डॉलरवर स्थिर राहिली.

Advertisement

‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’मध्ये सोन्याचा दर ऑगस्ट 2021 मध्ये 461 रुपयांनी (0.93 टक्के) घसरून प्रति 10 ग्रॅम 49,140 रुपये घसरला. ऑक्टोबरमध्ये सोन्याचा दर 531 रुपयांनी (1.06 टक्के) घसरत होता. तो प्रति 10 ग्रॅम 49,450 रुपये होता.

Advertisement

‘एमसीएक्स’वर, जुलै 2021 चा चांदीचा भाव 1,027 रुपये (1.41 टक्के) तोट्यासह 71,651 रुपये प्रति किलो राहिला. सप्टेंबर 2021 मध्ये चांदीचा भाव 951 रुपयांनी घसरून 72,865 रुपये प्रतिकिलोवर होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply