Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनचा असाही भन्नाट इफेक्ट; पहा नेमके काय दिसतायेत सकारात्मक परिणामही..!

दिल्ली : देशात प्रदूषणाची समस्या आहेच, आता तर ही समस्या खूपच घातक होत आहे. नवे उद्योग येत आहेत. कारखाने वाढत आहेत. शहरे विस्तारत आहेत. वाहनांची तर बातच सोडा, लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. मग आता प्रदूषण वाढणारच ना.. झालेही तसेच. आज देशातील मोठी शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात घट्ट अडकली आहेत. हे वाढत चाललेले प्रदूषण आता माणसांच्या जीवावरच उठले आहे. तरी देखील आपण शहाणपणा घेतला नाही. प्रदूषणाची समस्या सोडवली नाही. आपण पुढाकार घेतला नाही म्हणून काय झाले, करोना आला, त्यामुळे लॉकडाउन करावा लागला. सारेकाही ठप्प झाले, अन् झाले की झटक्यात प्रदूषण कमी..

Advertisement

होय, करोनाच्या पहिल्या लाटेत देशात जो लॉकडाऊन केला होता, त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली तसेच शहरी भागात जमिनीच्या तापमानातही घट झाली, असे एन्वायरमेंटल रिसर्च मध्ये प्रकाशित एका अहवालातून समोर आले आहे. दुसऱ्या लाटेत देशात लॉकडाऊन नसले तरी अनेक राज्यांनी लॉकडाऊन केला आहे. काही राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. याचाही काहीसा परिणाम म्हणून प्रदूषण कमी झाले आहे. मात्र, यावेळी असा काही अभ्यास अद्याप केलेला नाही. करोना महामारीच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देशातच लॉकडाऊन होता. या काळात सर्वकाही ठप्प झाले होते. उद्योग, कारखाने सुद्धा बंद होते. रस्त्यावर वाहने तर आजिबातच दिसत नव्हती. त्यामुळे ढासळत चाललेल्या पर्यावरणात सुधारणा झाल्याचे दिसून आले. हा अहवाल तयार करण्याआधी संशोधकांनी देशातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांचा अभ्यास केला. या अभ्यासात असे दिसून आले, की नायट्रोजन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट झाली आहे. राजधानी दिल्ली शहरात यामध्ये ४० टक्के घट झाल्याचे दिसून आले. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे भारतात दरवर्षी १६ हजार लोकांचा मृत्यू होतो, असेही या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

भारतातील प्रमुख शहरांतील जमिनीच्या तापमानात घट झाली आहे. ब्रिटनच्या साउथहैम्पटन युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर जादू दास यांनी सांगितले, की वायूमंडळातील प्रदूषकांमध्ये कमी आल्यामुळे तापमानात घट झाली आहे. तसे पाहिले तर, प्रदूषणाची समस्या आता जगासाठीच डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तत्काळ ठोस पावले उचलण्याचे अनेक वेळा सांगितले जाते. पण, यासाठी तयार कोण होणार हाच मोठा प्रश्न आहे. प्रदूषण कमी करायचे म्हणजे, कारखान्यांद्वारे होणारे वायूंचे उत्सर्जन कमी करावे लागेल, रसायनांचा वापर टाळावा लागेल, प्लास्टिकला नाही म्हणावे लागेल, वाहनांचा वापर कमी करावा लागेल, असे झाले तर त्याचा परिणाम वाहन उद्योगावर होईल या कामांची यादी फार मोठी आहे. ही कामे करावी लागतील. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता असे होणे केवळ अशक्यच आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply