Take a fresh look at your lifestyle.

बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेससह ‘त्या’ अहवालाला म्हटलेय ‘असे’; पहा काय पेटलेय राजकारण

दिल्ली : आपल्या देशात राजकारणाला काही कमी नाही. कोणताही काळ असो येथे राजकारणी मंडळी जोरात राजकारण करतात. लोकांना काय वाटेल याचा विचार करतो कोण, कोरोनाच्या संकटकाळात तर या राजकारणास आधिकच वेग आला आहे. कोणताही मुद्दा असो सत्ताधारी आणि विरोधक भांडत असतात. आता हेच पहा ना.. कोरोनाने देशातील कोट्यावधी लोकांचे रोजगार हिरावले. या समस्येवर मात करुन नवीन रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना या मुद्द्याने हरियाणा राज्यात काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात जोरदार वाद होत आहेत.

Advertisement

कोरोना महामारीच्या काळात देशातील कोट्यावधी लोक बेरोजगार झाले आहे. हरियाणा राज्यात बेरोजगारीचा दर २९.१० टक्के आणि ग्रामीण भागात हा दर ४१.८० टक्के आहे, असा दावा काँग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मात्र, यास प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल विज आणि शिक्षण मंत्री कंवरपाल गुर्जर यांनी ‘सीएमआयई’ च्या त्या अहलावारच प्रश्न उपस्थित केले. रोजगाराच्या मुद्द्यावर मात्र सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. राज्यात हजारो पदे भरली गेली नाहीत. सरकारने जाणूनबुजून भरती प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. राज्य सरकार एक तर लवकर भरती करत नाही. तर दुसरीकडे भरतीसाठी जाहीरात दिलीच तर लेखी परीक्षा आणि मुलाखती सुद्धा लवकर घेत नाही. एवढेच नाही तर एखाद्या वेळी परीक्षा आणि मुलाखती घेतल्या तरी ऐनवेळेस भरती प्रक्रियाच रद्द केली जाते, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. राज्य सरकारच्या अनेक परीक्षांचे पेपर लीक झाले. मात्र, सरकारने या प्रकरणी काहीच कारवाई केली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

काँग्रेसने केलेल्या या आरोपांवर भाजप प्रत्युत्तर देणार नाही, असे होणारच नाही. या मुद्द्यावर शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले, की मुळात राज्यातील बेरोजगारीचे जे आकडे सांगितले जात आहेत. तसेच सीएमआयई संस्थेचा जो अहवाल आहे, त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. कारण, ही संस्था राजकीय पक्षाशी निगडीत आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात असे राजकारण जोरात सुरू आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले, ऑक्सिजनची कमतरतेमुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले. लसीकरणाचे नियोजन फसले, लसींच्या कमतरतेमुळे राज्यांना लसी मिळेनात, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक रोजच केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply