Take a fresh look at your lifestyle.

बारावी परीक्षा रद्द; मात्र, मूल्यमापन करण्यासाठी ‘ती’ आहे मोठी अडचण..!

नाशिक : सीबीएसई (CBSE) बोर्डाने इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता अखेर राज्यातील बारावीची परीक्षाही रद्द (HSC exam) करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे.

Advertisement

परीक्षा रद्द झाली मात्र, बारावी परीक्षेचा निकाल कसा लावायचा याचा फॉर्म्युला शिक्षण विभागाला तयार करावा लागणार आहे. दहावीप्रमाणेच इयत्ता नववी, दहावी व अकरावीच्या गुणांची सरासरी काढून बारावीचा निकाल लावणे शक्य नाही. मात्र, मागील वर्षी करावीची परीक्षा झालेली नसल्याची अडचण आहे. त्यामुळे पदवी प्रवेशासाठी सीईटीच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो. मात्र, याचा फॉर्म्युला जाहीर झाल्यावरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचे सांगितले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दहावीप्रमाणेच राज्यातील बारावीची विद्यार्थ्यांचेही मूल्यमापन केले जाईल, असे म्हटले जात आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला. बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या निर्णयाचा १४ लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply