Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईवरून राजकारण जोरात; विखेंचे राज्याकडे, तर मंत्री तनपुरेंचे केंद्राकडे बोट

अहमदनगर : राज्यभरात सध्या करोना लसीकरण अभियान ठप्प आहे. कंपन्या थेट राज्य सरकारला लस देत नाहीत, तर केंद्र सरकारकडून अपुरा लस पुरवठा होत असल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यावर ठोस तोडगा काढण्याची कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याची इच्छा नाही. उलट त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करून राजकीय लाभ उपटण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात असाच वाद पेटला आहे.

Advertisement

राज्य सरकारने लस उपलब्ध करून दिल्यावरच हस्तक्षेप करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेल्या रुग्णवाहिकेचा विषय केंद्र सरकारचा असताना राज्य सरकारमधील मंत्री स्वत:ची हौस भागवण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याचा टोला डॉ. विखे यांनी तनपुरे यांना लगावला होता. त्यावर कोरोनाची लाट ओसरल्यावर रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करणाऱ्या खासदार डॉ. विखे यांनी लसीकरणाबाबत ज्ञान पाजळू नये, असे प्रत्युत्तर दिलेले आहे.

Advertisement

तनपुरे यांनी म्हटले आहे की, खासदार डॉ. विखे या करोना संकटाच्या कालावधीत एकदाही राहुरी तालुक्यातील कोविड सेंटरकडे फिरकले नव्हते. सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना आरोग्य सोयी-सुविधा देण्याचे नियोजन आम्हीच केले. उलट कृषी विद्यापीठाच्या वातानुकूलित कक्षात बसून लसीकरणावर राजकारण करण्यात खासदार व्यस्त आहेत. त्यांनी तसे करण्याऐवजी केंद्राकडून राज्यात तुटपुंज्या लशी येतात. याकडे खासदार या नात्याने लक्ष द्यावे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply