Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात तेजीचे वातावरण, पाहा कोणी कमावलं, कोणी गमावलं..?

नवी दिल्ली : शेअर बाजारात आज (गुरुवारी) ‘बीएसई’वर व्यवसाय बंद होताना, एकूण 3,311 कंपन्यांच्या शेअर्सची विक्री झाली. त्यात 2,189 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ, तर 982 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. आजची एकूण मार्केट कॅप 2,26,49,757.60 रुपये होती. BSEच्या 30 पैकी 22 शेअर्स नफ्यावर ट्रेड करत आहेत, तर 8 खाली आहेत. तसेच निफ्टीच्या 50 पैकी 35 कंपन्यांचे शेअर्स वधारले.

Advertisement

शेअर बाजारात आज प्रचंड वाढ झाली. व्यापार संपल्यानंतर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 382.95 अंकाच्या (0.74 टक्के) तेजीसह 52,232.43 वर बंद झाला. दुसरीकडे एनएसई निप्टी (NSE Nifty) 114.15 अंकाच्या (0.73 टक्के) बळावर 15,690.35 च्या पातळीवर बंद झाला.

Advertisement

दिवसभराच्या व्यापारात निफ्टी 15,700 च्या पातळीला स्पर्श करण्यात यशस्वी झाला. त्याचबरोबर सेन्सेक्सदेखील दिवसाच्या व्यापारात 52,273.23 च्या वरच्या पातळीवर पोहोचला होता.

Advertisement

व्यापार संपल्यानंतर टायटनचा स्टॉक 6.69% पर्यंत वाढला. त्यानंतर ओएनजीसी, एलटी, कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एनटीपीसी, एसबीआय, भारती एअरटेल, टीसीएस, रिलायन्स, मारुती, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेकचा क्रमांक लागतो.
सिमेंट आणि आयटीसीच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली आहे. तर इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, बजाज ऑटो, एम अँड एम, डॉ. रेड्डीज, एचसीएल टेक, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह यांचा भाव खाली आला.

Advertisement

टायटन, ओएनजीसी, आयशर मोटोर, एलटी आणि एक्सिस बँक यांचा NSE मध्ये वेगवान शेअर्स होता. त्याचबरोबर इंडसइंड बँक, विप्रो, डॉ. रेड्डी आणि टाटा स्टील यांचे शेअर्स आज तोट्यात होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply