Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ युट्युबर्सना नाही बसणार झटका; पहा कोणत्या निर्णयामुळे द्यावा लागणार तब्बल 24 टक्के कर..!

पुणे : युट्युबर्स (YouTube) बनून पैसे कमावण्याची नवी संधी कंटेट क्रीएटर (Content Creator) मंडळींना खुली झाली आहे. त्यामुळेच अगदी गावोगावी आणि गल्लोगल्ली सध्या युट्युबर्स पाहायला मिळत आहेत. आपल्या व्हिडिओच्या जीवावर पैसे (USD Dollar $) कमावणारे हे काही मंडळी आता सेलिब्रिटीही बनले आहेत. मात्र, त्यातीलच काहींना मोठा झटका बसणार आहे. कारण, युट्युबर्सना आता तब्बल 24 टक्के इतका कर द्यावा लागणार आहे. मात्र, भारतातील बहुसंख्य युट्युबर्सना याचा तितकासा फटका बसणार नाही.

Advertisement

गुगलची (Google) नवी पॉलिसी (New Policy) अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशातील कंटेंट क्रिएटर्सवर लागू झालेली आहे. त्यानुसार आता अमेरिकेत पाहिल्या गेलेल्या व्हिडिओवर मोठा करभार द्यावा लागणार आहे. अमेरिकेच्या दर्शकांकडून कमाई करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सकडून टॅक्सची माहिती घेण्यासह कमाईतून टॅक्स कापावा आणि याची माहिती इंटरनल रेव्हेन्यू सर्विसला द्यावी अशी ही नवीन पॉलिसी आहे. अमेरिकेचा कर कायदा ‘इंटरनल रेव्हेन्यू कोड’ च्या चॅप्टर तीन अंतर्गत हे सगळे आता बंधनकारक केलेले आहे.

Advertisement

दि. 1 जून 2021 पासून ही नवी पॉलिसी लागू झालेली आहे. यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्राममध्ये सामील सर्व कंटेंट क्रिएटर्सना 31 मेपर्यंत टॅक्सची माहिती देणे गरजेचे केले होते. अशी माहिती आता संकलित झाली असून लागू झाली आहे. त्यानुसार कोणत्याही भाषेतील व्हिडिओ अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या प्रदेशात पाहिले तर, त्यावरील कर युट्युबर्सना द्यावा लागणार आहे. मात्र, भारतीय युट्युबर्सचे खूप कमी प्रेक्षक अमेरिकेत आहेत. त्यातही हिंदी व इंग्रजी याचेच जास्त आहेत. मराठीसह इतर प्रादेशिक भाषेचे प्रेक्षक तिकडे खूप कमी असल्याने तसाही अनेकांना काहीच फरक पडणार नाही.

Advertisement

तुम्हालाही आपला यूट्यूब चॅनेल सुरू करायचा असेल तर पहा काय आहेत कंटेंट क्रिएटर्ससाठी गूगलच्या अटी :

Advertisement
 1. कंटेंट क्रिएटर्सच्या कमाईचा मोठा भाग गूगल आपल्याकडे ठेवतो
 2. चॅनेलला मॉनिटाइज करायचे असेल, तर गूगलच्या काही अटी मान्य कराव्या लागता
 3. चॅनेलवर आलेल्या जाहिरातींच्या पैशातील 45 % गूगल स्वतःकडे ठेवतो
 4. म्हणजेच युट्युबर्सना फ़क़्त 55 टक्के इतकाच रेव्हेन्यू शेअर मिळतो
 5. यूट्यूबच्या जाहिरातीमधून गूगलला वर्षाला 1 लाख कोटी रुपयांची कमाई होते
 6. यूट्यबरच्या 1000 रुपयांच्या कमाईवर फक्त 15 रुपये टॅक्स
 7. भारत आणि अमेरिकेत टॅक्स करार झाला आहे. यानुसार, दोन्ही देशांच्या दर्शकांकडून झालेल्या एकूण कमाईवर 15 % टॅक्स
 8. नव्या नियमाने एकूण कमाई 1000 रुपये असेल, तर 240 रुपये टॅक्स द्यावा लागेल
 9. टॅक्सची माहिती दिली असेल, तर फक्त अमेरीकन दर्शकांकडून झालेल्या कमाईवर टॅक्स लागेल
 10. गूगलला टॅक्सची माहिती दिल्यानंतर फक्त अमेरिकन दर्शकांकडून झालेली कमाईवरच टॅक्स लावला जाईल

भारताचे व्हिडिओ अमेरिकेत जास्त पाहिले जात नसल्यामुळे भारतीय क्रिएटर्सवर नवीन नियमचा जास्त परिणाम होणार नसल्याचे अनेक तज्ञांना वाटत आहे. त्यामुळे भारतीय क्रिएटर्ससाठी ही माहिती भरून देणे आवश्यक आहे. बाकी त्यांच्यावर काही खास परिणाम होणार नसल्याचे सध्यातरी दिसत आहे.

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply