Take a fresh look at your lifestyle.

भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवरच हल्ला; हिस्ट्रीशीटर गुन्हेगारालाही सोडले मोकाट; पहा नेमका काय घडलाय प्रकार

दिल्ली : उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या मनमानीचे प्रकरण समोर आले आहे. येथे चोरी आणि हत्येच्या प्रयत्नातून फरार असलेल्या हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराला अटक केल्याच्या विरोधात भाजपने पोलिसांशी संघर्ष केला. इतकेच नव्हे तर तासभर चाललेल्या गदारोळानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या तावडीतून मुक्त करण्यातही यश मिळवले आले.

Advertisement

बुधवारी नौबस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उस्मानपूर भागात गेस्ट हाऊस येथे भाजपाचे जिल्हामंत्री नारायण भदौरिया यांचा वाढदिवस साजरा करीत होते. ज्यामध्ये हिस्ट्रीशीटर मनोज सिंग पोहोचला. वाढदिवसाच्या कार्यक्रमात हिस्ट्रीशीटरच्या आगमनाची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच पोलिस याची पुष्टी करण्यासाठी साध्या गणवेशात तेथे पोहोचले. तिथे हिस्ट्रीशीटर फरार गुन्हेगार पाहून पोलिसांनी जास्तीचा फोर्स बोलवला. पोलिस पथकाने घटनास्थळावरून हिस्ट्रीशीटरला अटक केली आणि त्याला जीपमध्ये बसवले. त्याचवेळी हिस्ट्रीशीटरच्या अटकेचा निषेध करत भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

Advertisement

यादरम्यान पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी जीपसमोर पडून पोलिसांच्या विरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे हमीरपूर रोडवर चक्काजाम झाला. सुमारे एक तास चाललेल्या गोंधळानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या जीपमधून हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराला बाहेर काढले. पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर मनोजसिंग तेथून पळून गेला. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मनोजसिंग सध्या चोरी आणि खुनाच्या प्रयत्नात फरारी आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply