Take a fresh look at your lifestyle.

तयारीत राहा.. अभ्यास करा.. कारण, ‘त्या’ पद्धतीने मिळणार आहे अकरावीला अॅडमिशन

पुणे : दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघा देश हतबल झाल्याने हा महत्वाचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारला घ्यावा लागला आहे. त्यामुळे जीवनात शिक्षण आणि एकूण करिअरला वेगळा मार्ग दाखवणाऱ्या अकरावी प्रवेशाचा मुद्दाही आहेच की. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेत प्रवेश घेण्यासाठी त्यामुळेच राज्य सरकारने एक खास पद्धत आणली आहे. आज आपण या लेखात त्याचीच माहिती पाहूया.

Advertisement

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे जूनअखेर निकाल जाहीर होतील. तसेच अकरावीच्या अॅडमिशनसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रवेशप्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. निकालानंतर अकरावीसाठी सीईटी जुलै व ऑगस्ट महिन्यात होईल. कला, विज्ञान व वाणिज्यसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी याद्वारे प्रवेश निश्चित केले जातील.

Advertisement

परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे राहील. १०० गुणांच्या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. परीक्षा विद्यार्थ्यांना ऐच्छिक असेल; मात्र प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जाईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर इतर विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याची कार्यवाही केली जाईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply