Take a fresh look at your lifestyle.

नफेखोरांकडून शेअर विक्रीचा सपाटा, त्याचा शेअर बाजारावरील परिणाम जाणून घेण्यासाठी वाचा..!

मुंबई : शेअर बाजारात (Share Market) गेल्या काही सत्रापासून तेजी दिसत होती. नजीकच्या काळात कुठलीही जोखीम दिसत नसल्याने आज स्माॅल कॅप (Small cap) आणि मिडकॅप (Midcap) शेअरची तुफान विक्री झाली. त्यामुळे सेन्सेक्स (sensex) आणि निफ्टीत (Nifty) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 300 अंकांनी, तर निफ्टी 92 अंकांनी घसरला होता.

Advertisement

विशेषतः आज बँका आणि आयटी सेवा कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्समधील नेस्ले, इंडस इंड बँक, रिलायन्स, एल अँड टी, एचडीएफसी बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, आयटीसी आणि टेक महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली.

Advertisement

या शेअरमध्ये वाढ
एनटीपीसी, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर, डॉ. रेड्डी लॅब, ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो या शेअरमध्ये वाढ झाली. धातू क्षेत्रात जिंदाल स्टील, स्टील ऑथॉरिटी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील या शेअरमध्ये वाढ झाली.

Advertisement

दरम्यान, चलन बाजारात आज डॉलरसमोर रुपयाचे 27 पैशांनी अवमूल्यन झाले. डॉलरसमोर रुपया 73.17 रुपयांवर होता. सेन्सेक्स 399 अंकांनी घसरून 51,535 अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टीत 89 अंकांची घसरण झाली असून, तो 15,485 अंकांवर ट्रेड करत होता.

Advertisement

मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. बाजारात चढ-उतार दिसत असले तरी, बाजार मोठी उसळी घेण्याची शक्यता असल्याचे ग्लोबल कॅपिटलचे (Global capital) हिमांशू गुप्ता यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply