Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : प्रयोगशील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने केले हुमणी किडीचे नियंत्रण

अहमदनगर : फळबागेसह सर्वच पिकांना सध्या मोठ्या प्रमाणात किडरोगाचा सामना करावा लागत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि शेतीमधील बदललेल्या पिकपद्धतीमुळे असे होत आहे. त्याच्याशी सामना करताना शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे. तोच नियंत्रणात ठेवण्याचा फंडा कळंब (ता. अकोले) येथील शेतकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

हुमणी किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन हुकूमी आणि यशस्वी प्रतिबंधक उपाय कळंब येथील शेतकर्‍यांनी शोधला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे अनेक शेतकर्‍यांनी या किडीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. बाळूमामा शेतकरी गटाचे शैलेंद्र भोर, सोपान भोर, संभाजी ठोंगिरे व इतर शेतकर्‍यांनी कृषी पर्यवेक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हुमणी किडीचे नियंत्रणासाठी घरगुती पद्धतीचा प्रकाश सापळा कडुलिंबाच्या झाडाखाली तयार केला आहे. प्रकाश सापळा प्रयोगाची उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब बांबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी, आत्म्याचे बाळनाथ सोनवणे, कृषीसेवक अनिल फाफाळे यांनी शेतकरी शैलेंद्र भोर, सोपान भोर, संभाजी ठोंगिरे व इतर शेतकर्‍यांसमवेत पाहणी केली.

Advertisement

असा बनवला आहे सापळा : खड्डा करून त्यात प्लास्टिक कागद अंथरला. त्यात पाणी भरून किटकनाशक टाकले. खड्ड्याच्यावर मध्यभागी तीन काठ्यांचे तिघाड करून पाण्यापासून दोन ते तीन फूट उंचीवर त्याला साधा बल्ब लावला. त्यामुळे कडूलिंबाचे पाने खाण्यासाठी व मिलनासाठी आलेले हुमणी किडीचे भुंगेरे प्रकाशाला आकर्षित होऊन कीटकनाशक मिश्रीत पाण्यात गोळा झाले. पहिल्या अर्धा तासात साधारण दोनशे ते तीनशे लहान मोठे भुंगेरे पाण्यात पडून जमा झाले.

Advertisement

हुमणीविषयी माहिती : खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरित्या करणे आवश्यक आहे. प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात.तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात.

Advertisement

हुमणी दुष्परिणाम : परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसर्‍या झाडाकडे वळते. त्यामुळे शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते. त्यामुळे पाऊस पडल्याबरोबर जमिनीतून बाहेर पडणारे हे हुमणी किडीचे भुंगेरे प्रकाश सापळा लावून नष्ट करणे गरजेचे आहे. हा अत्यंत साधा, सोपा कमी खर्चाचा घरगुती प्रयोग असून भविष्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी आपल्या शेतात सायंकाळी हुमणी किडीचे भुंगेरे नष्ट करण्यासाठी या प्रकारे घरगुती प्रकाश सापळा लावावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने सर्व शेतकर्‍यांना करण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply