Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामूळे’ उडणार इंधनभडका; पहा कशामुळे मोकळे होणार आपले खिसे

मुंबई : देशातील करोनाच्या संकटात नागरिकांना वाढत्या महागाईने पुरते बेजार केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती इतक्या वाढल्या आहेत, की कधी नव्हे ते पेट्रोल आज शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. अनेक मोठ्या शहरात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. इंधनाचे भाव आज नाही तर उद्या कमी होतील, असे नागरिकांना वाटत आहे. पण, जरा थांबा, सध्या असे काहीही होणार नाही. इंधनाच्या दरवाढीतून नजीकच्या काळात कोणताही दिलासा मिळणार नाही, असे दिसत आहे. इंधनाची मागणी कमी होत आहे, तरीसुद्धा भाव का कमी होणार नाहीत, असा प्रश्न डोक्यात आला असेलच.. याचे कारणही मिळाले आहे.

Advertisement

आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता नाही, याचे कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ७० डॉलर प्रति डॉलरच्याही पुढे गेले आहेत. आणि दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे, करोना विषाणूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांकडून पेट्रोलियम पदार्थांची मागणी वाढली आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीतून भारतीयांना लवकर दिलासा मिळण्याची शक्यता आता मावळली आहे. याबाबत आधिक माहिती देताना आयआयएफएल सिक्योरिटीचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले, की या महिन्याच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर ७३ डॉलर प्रति बॅरलच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement

देशात इंधनाचे दर वाढत आहेत. दुसरीकडे महागाई सुद्धा वाढत आहे. इंधनाच्या दरवाढीने देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम केला आहे. महागाई वाढण्यातही हाच घटक प्रामुख्याने जबाबदार असल्याचे खुद्द वाणिज्य मंत्रालयानेच सांगितले आहे. एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १०.४९ टक्के होता. त्याआधी मार्च महिन्यात हा महागाई दर ७.३९ टक्के इतका होता. पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढल्याने महागाई सुद्ध वाढली असे मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, मागील वर्षाचा विचार केला तर त्या तुलनेत या वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाट वाढले आहेत. एप्रिल महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्याने दर स्थिर होते. त्यानंतर इंधनाचे दर इतके वेगाने वाढले की अनेक शहरात शंभरचा टप्पा सुद्धा पार केला आहे. मागील वर्षातील जूनमध्ये एक लिटर पेट्रोल ७१.२६ आणि डिझेल ६९.३९ रुपयांना मिळत होते. आज मात्र यामध्ये मोठी वाढ झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply